Lumpy is growing rapidly in the country including Maharashtra

महाराष्ट्रासह देशात लंम्पी झपाट्याने वाढत आहे, त्याची लक्षणे आणि उपाय ..

सध्या सगळीकडे कोरोना सारखा लंम्पी हा झपाट्याने वाढत आहे. हा जनावरांना होत आहे. वेग वेगळ्या राज्यात या चे वेगवेगळे परिणाम दिसत आहेत. यामध्ये जनावर मारताना आपल्याला दिसत आहेत, जास्त करून यामध्ये गाईचा समावेश आहे . लंम्पी यामुळे हजारो संख्येमध्ये गाई मरण पावल्या आहेत. लंम्पी वर अजून कोणतीच औषधे तयार झालेली नाहीत.

लंम्पी आजार होण्याच्या आधीची लक्षणे:-

ज्या गाई-म्हैस दूध देतात त्या दूध देणे बंद होते. त्यांच्या नाकातून आणि डोळ्यातून पाणी येते. त्यांच्या आंगातला ताप वाढतो, त्यांना भुक लागत नाही आणि पाणी पिणं पण कमी होत. त्यांना शरीरावर गाठी येतात. त्यांचे वजन पण कमी होते. त्यांच्या पायाला सूज येते, आणि लंगडी पण होतात. अशी हि साधारण लक्षणे आहेत पण काही जनावराची वेगवेगळी पण लक्षणे असू शकतात.

लंम्पी या आजाराचा प्रसार कसा होतो ते आपण पाहुयात .

जनावरांना डास, माश्या आणि गोचीड हे नेहमी चावताना दिसतात . ह्या पद्धतीने या रोगाचा प्रसार होत असतो, म्हणजे एका जनावराला लावलेले डास , गोचीड आणि माश्या ह्या दुसऱ्या जनावरावर जाऊन बसतात आणि या रोगाचा प्रसार होतो. तसेच दूध पिणाऱ्या वासरांना आई कडून हा प्रसार होतो, आणि ज्यांना हा लंम्पी आजार झाला आहे त्याच्या स्पर्शाने इतरांना हा होतो. लंम्पी या आजार पसरण्याची अजून वेगळी कारणे असू शकतात.

लंम्पी हा आजार रोखण्यासाठीचे उपाय:-

लंम्पी हा आजार टाळण्यासाठी जनावरांची खरेदी विक्री कमी करावी. जनावरांचा गोठा हा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा . जनावरांची नीट काळजी घेतली गेली पाहिजे. जनावरांच्या गोठ्यात कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. जनावरांना पौष्टिक आहार दिला गेला पाहिजे. ज्या जनावराला लंम्पी हा आजार झाला आहे त्या जनावराला वेगळे ठेवला पाहिजे म्हणजे त्यांचा इतर जनावरांशी संपर्क कमी होऊन लंम्पी च प्रसार कमी होईल. जनावरांचा लंम्पी आजार कमी करण्यासाठी उपाय केले तर ते कमी होण्यास मदत होईल. लंम्पी आजार कमी करण्यासाठी नागिलीची पाने म्हणजेच खाऊची पाणी , काली मीरीची आणि मीठ हे सगळे गुळात मिक्स करून आठ दिवस रोज जनावरांना दिल्यास लंम्पी हा आजार कमी होण्यास मदत होऊ शकते. जनावरांच्या गोठ्यात कडुलिंबाच्या पानाचा धूर करावा म्हणजे लंम्पी आजार रोखण्यास मदत होऊ शकते.