लाईफस्टाईल

मकरसंक्रांती २०२३, भोगी सण का व कसा साजरा करतात.

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात खर तर मकरसंक्रांतीचा सण हा ३ दिवस चालतो, आदल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांति व तिसऱ्या दिवशी किंक्रांती असते आजच्या लेखात आपण भोगी सनाबद्दल विशेष माहिती आपण जाणून घेऊयात. ह्या वर्षी २०२३ साली भोगी हा सण १४ जानेवारी शनिवारी आलेली आहे.

मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीत एक म्हण आहे, न खाये भोगी तो सदा रोगी थोडक्यात भोगी हा खाण्यापिण्याचा उपभोगण्याचा आनंदाचा सण मानला जातो. ह्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे आपण आपले घर अंगण साफ स्वच्छ करावा. दारासमोर एक सुंदर अशी काढावी, घरातील सर्वानी सकाळी अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर आपण नवीन कपडे तयार करावेत.

मित्रांनो ह्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडेसे तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी हि पंरपरा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. भोगीच्या दिवशी शक्यतो महाराष्ट्रात भोगीची मिक्स भाजी केली जाते. तिला भोगीची भाजी, लेकरवाळु भाजी, खेंदाट असे म्हणतात.

सोबत बाजरीची भाकरीसुद्धा तीळ लावून केली जाते. ह्या भोगीच्या भाजीसोबत आणि तीळ लावलेल्या भाकरीसोबत, लोणी, चटणी, खिचडी, पापडइत्यादी पदार्थ करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. अनेकांकडे मुली आपल्या माहेरी जातात व भोगी आपल्या माहेरी साजरा करतात.

भोगी साजरी का केली जाते ?

ह्या दिवशी इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिके पिकवीत म्हणून प्रार्थना केली होती, म्हणून हि पिके वर्षानुवर्षे अशीच पिकत राहावी चांगले पीक यावे अश्या प्रकारच्या प्रार्थनेसह हि भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी अनेक राज्यात लहानशी होळी पेटवून त्या दिवशी काही वस्तूंची आहुती देखील देतात.

ह्या दिवशी करण्यात येणारी जी भाजी असते ती खूप पौष्टीक असते. खरं तर हा हिवाळ्याचा मौसम ह्या दिवसात अनेक प्रकारच्या भाज्या येतात शेतीला नवीन बहार आलेला असतो आणि म्हणून ह्या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या भाकरीचा आस्वाद घेतल्याने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते, जी संपूर्ण वर्षभर आपल्याला कार्य करण्यास सज्ज करते.

हा भोगीचा सण हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर साजरा केला जातो, तमिळनाडू मध्ये ह्याला पोंगल असे म्हणतात आसाम मध्ये भोगलीभीऊ तर पंजाब मध्ये लोहिरी आणि राजस्थान मध्ये उत्तरावण नावाने हा सण साजरा केला जातो.

मित्रांनो मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी हि भोगी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा अंगीकार करण्याचा हा दिवस आहे. मकरसंक्रांतीला वर्षभर काही चुकले असेल तर ते तिळगुळ देऊन क्षमा मागण्याचा दिवस वर्षभर आपलय नात्यातील गोडवा असेच टिकून राहूदे अश्या शुभेच्छा आपण या वेळी देत असतो.

तर मित्रांनो हि होती भोगी सांबद्दलची माहिती, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर हा लेख तुमची तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला नक्की शेयर करा.