निर्माल्यातिल फुलांचा घरगुती उपाय., योग्य उपयोग करून घ्या निर्माल्यात फुलांचा , Make proper use of flowers
किचन टिप्स

निर्माल्यातिल फुलांचा घरगुती उपाय. ते फेकून देऊ नका घराबाहेर.

प्रत्येकजण रोज देवासाठी फुले घेऊन येतात. रोज आपण देवाला फुले अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन फुले आणून जुनी फुले फेकून देतो किंवा वहात्या पाण्यात सोडून देतो. फक्त घरातच ते होते असे नाही मंदिरात सुद्धा रोज फुले अर्पण केली जातात आणि दुसऱ्या दिवशी निर्माल्यातिल फुले फेकून देतात. पण जर का पण असे नकरता त्याचा उपयोग घरातील इतर गोष्टी साठी केल्यास फायदाच होईल.चलातर जाणून घेऊ निर्माल्यातिल फुलांचा घरगुती उपाय

येत्या काही दिवसांनी गपणती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्या वेळेस सुद्धा बऱ्याच घरात रोज फुले देवाला अर्पण केली जातात. तसेच ज्या ठिकाणी गणपती बाप्पा यांची प्राणपतिष्ठा केली जाते त्या ठिकाणी सुद्धा अनेक फुले आणि त्यापासून तयार केलेले हार अर्पण केले जाते. आणि दुसऱ्या दिवशी हे निर्माल्य फेकून दिले जाते किंवा ज्या ठिकाणी साठणुक होते त्या त्याठिकाणी ठेवले जाते किंवा पाण्यात विसर्जित केले जाते.

निर्माल्यातिल फुलांचा घरगुती उपाय.

तसे पहिल्या गेल्यास बऱ्याच ठिकाणी निर्माल्यापासून झाडांसाठी खत तयार केले जाते. तर काही ठिकाणी तसेच ठेऊन ते कुजले जाते म्हणजे त्याचा कोणताच वापर होत नाही. पण अशी गोष्ट होऊ नये म्हणून आपण घराच्या घरी निर्माल्यापासून सुंदर उपाय करून घरातील वातावरण नक्की चांगले करून घेऊ शकतो.

निर्माल्याचा उपयोग घरच्या घरी कसा करायचा याबद्दल जाणून घेऊन. आपण दोन ते तीन दिवसांचे निर्माल्य एकत्र करून तुम्ही त्याची पाखळ्या काढून घ्या. कोणतीही फुले असल्यातरी चालेल. त्यानंतर त्या वळून घ्या किंवा तव्यावर गरम करून घेतल्यास तरी चालेल. आपल्या ओली फुले चालणार नाहीत म्हणून असे करायचे आहे. जर का तुमच्या कडे ओव्हन असेल तर त्यात सुद्धा गरम करून घ्या चांगल्या प्रकारे वाळून घ्या.

त्यानतंर लोभान घायचे आहे. तुम्हला माहित असेल लोभानचा उपयोग हवा शुद्ध करण्यसाठी होतो. त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मध्यम आकारचे लोभान घ्या त्यानतंर कापुरच्या दोन ते तीन छोड्या वड्या घ्या. या तिन्ही गोष्टी एकत्र करा. फुलांच्या पाखळ्या, लोभान, आणि कापूर. आता या तिन्ही गोष्टी मिक्सर मध्ये एकत्र करून बारीक करा. बारीक झल्यावर एक डिश मध्ये काढून घ्या.

तुम्हला आता गाईचे तूप घ्याचे आहे. आणि आपण बारीक केलेले जे मिश्रण आहे. त्यात दोन चमचे (गरजे नुसार ) तूप टाकायचे आहे. आणि सर्व इतर करून मिक्स करायचे आहे. तुमच्या कडे दिवाळीत जी पणती लावतो ती घ्याची आहे आणि त्यात हे मिश्रण ठेवायचे आहे. आणि त्यावर एक कापराची वडी ठेऊन ते प्रज्वलित कायचे आहे. यामुळे घरातील हवा सुद्धा होईल तसेच घरातील वातावरण सुद्धा फ्रेश होईल. आणि त्या निर्माल्याचा योग्य उपयोग सुद्धा होईल. हे तयार केलेले मिश्रण जवळ पास पाच ते सात दिवस चालते. यामुळे योग्य पमाणात तयार करा.

हे पण वाचा : फ्रिज स्वच्छ करण्याची सोपी पद्धत.

जर का तुम्हला प्रक्रिया करायची नसेल तर निर्माल्य इतर करून पाखळ्या वेगळ्या करून त्या बारीक करून घ्या आणि आपल्या घरातील झाडांना खत म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकतो. यामध्ये कोणत्याही पकारचे दुसरे घटक टाकू नका फकीर फुलेच घ्या.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.