धार्मिक

या सात पैकी ही एक वस्तू श्रावण महिन्यात नक्की खरेदी करून घरी घेऊन या.

सर्वात पवित्र श्रावण महिना येत्या काही दिवसावत सुरू होणार आहे. या पवित्र श्रावण महिन्यात जे व्यक्ती उपासना करता त्यांना भविष्यात नक्कीच लाभ मिळतात. संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवाच्या उपासने साठी किंवा नामस्मरणा साठी असतो. याच महिन्यात अनेक बव्यक्ती आपल्या नवीन कामाची सुरवात करतात. बरेच व्यक्ती संपूर्ण श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शना साठी मंदिरात जात असतात.

या श्रावण महिन्यात जर का तुम्हला काही समस्या येत असतील तर भगवान महादेवाची उपासना नक्की करा यामुळे तुम्हला येणारी समस्यांचे निराकरण किंवा त्यारून बाहेर निघण्याचे अनेक मार्ग दिसून येतील. अशी एक मान्यता आहे. जर का या सात पैकी एखादी वास्तू आपण श्रावण महिन्यात घरी घेऊन आलोत तर त्याचे लाभ आपल्या घरातील सर्वांवर होतात. अशा कोणत्या वस्तू आहेत बद्दल आपण जाणून घेऊ.

श्रावण महिन्यात या सात वस्तू खरेदी करून आणा

सर्व वस्तू आपण श्रावण महिन्यात घरी घेऊन येणार आहोत याचाच अर्थ अशा आहे कि या सर्व वस्तू भगवान महादेवाच्या निगडित वस्तू आहेत. या वस्तू आपण घरी घेऊन आपल्या आपल्या घरात सकारात्मकता निर्माण होतेच शिवाय प्रत्येक व्यक्तील कामात येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत सुद्धा होते. घरात सतत आर्थिक समस्या निर्माण होत असतील. घरात सतत भांडणे होत असतील अशा वेळी या वस्तू घरात आणल्यास त्याचे परिणाम चांगले होण्यास मदत होते.

पहिली वस्तू म्हणजे त्रिशुळ. महादेवाच्या हातात जे शस्त्र आपण पहातो ते म्हणजे त्रिशूल होय. त्रिशूल हे तीन देवाचे प्रतीक होय. ब्रम्हा विष्णू महेश यांचे प्रतीक म्हणजे त्रिशूल होय. आपल्या घरात छोटेसे चांदीचे त्रिशुळ नक्की ठेवा यामुळे आपल्या घरावर संकटे येत नाही. जर का चांदीचे शक्य नसेल तर तांब्याचे तयार केले तर चालते. किंवा इतर धातूचे जरी केले तरी चालते.

दुसरी वस्तू म्हणजे डंबरू. ज्या घरात रोज डिब्रुचा नाद केला जतो त्या घरात आनंदी वातावरण तयार होण्यास मदत होते. कारण या डंबरू मधून जो काही आवाज बाहेर निघतो त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाचा नाश होतो. तसेच घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा ज्यावेळी आपली देपूजा पूर्ण होते त्या नंतर डंबरू नक्की वाजवा.

तिसरी वस्तू आहे रुद्राक्ष. रुद्राक्षाची उत्पत्ती मागे एक मोठी कथा आहे. हे तुम्हला माहित असेल. ज्या घरात रुद्रक्ष असते त्याघरात वाईट शक्ती नाश पावते. तसेच घरातील लोकांना सुख समृद्धी यांची प्राप्ती होते. रुद्राक्षाची स्थापना आपल्या घरातील देवघरात केली तरी चालते तसेच आपल्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष घालते तरी चालते. जर का आपण रुद्राक्ष गळ्यात धरण करणार असतात तर ब्रम्हचर्याचे पालन करणे आवश्यक्य आहे.

चैथी वस्तू म्हणजे शिवमंदिरातीळ भस्म. भस्म घरात आणणे याला खुप मोठे महत्व आहे. श्रावण महिन्यात भस्माची पूजा करणे आणि ते रोज लावणारे याला खुप महत्व आहे. त्यामुळे आपल्या घराच्या जवळील शिव मंदिरातून भस्म घेऊन या.

पाचवी वस्तू आहे ती म्हणजे नागनागील. श्रावण महिन्यात चांदीचे नागनागिन नक्की घरी घेऊन या. ज्यांचा पत्रिकेत सर्पदोष आहे अशा लोकांनी अवश्य त्याची पूजा करावी. आणि श्रावण महिना झाल्यावर वाहत्या पाण्यात हे नागनागिन सोडून द्याचे आहेत. यामुळे कालसर्प दोषाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

सहावी वस्तू म्हणजे कलश. कोणत्याही एका धातूचा कलश आपल्या घरी घेऊन या. कलश हा छोटा किंवा माध्यम आकाराचा असला तरी चालतो. याने गंगा जल भरून तेव्हा किंवा आपल्या घराजवळील पवित्र नदीचे पाणी यात भरले तरी चालते , आणि या पाण्यापासून रोज महिनाभ महादेवाला या पाण्याने अभिषेक करा. त्याच सोबत ओम नमः शिव असा मंत्र जप करायचा आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.