Make sure to do these remedies on Sankashti Chaturthi
धार्मिक

९ फेब्रुवारी,संकष्टी चतुर्थीला हे उपाय नक्की करा, पैश्याच्या अडचणी आणि संकटे होतील नाहीसे…

मित्रानो सध्या माघ महिना चालू आहे आणि ९ फेब्रुवारीला माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे.त्या दिवशी गुरुवार आलेला आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पाना प्रसन्न करू शकतो. सगळ्या देवात गणपती बाप्पा हे सगळ्यात श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा गणपती बाप्पा हे पूर्ण करतात.

मित्रानो गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांच्या इच्छा आणि त्यांची विघ्न ते दूर करतात. तसेच गणपती बाप्पा हे सुखकर्ता देखील आहेत. त्यांना सगळेच सुखी असावे असे वाटते.त्यामुळे संकष्टी चतुर्थी ला गणपती बाप्पाची पूजा हि अवश्य करावी . तसेच काही जण या दिवशी संकष्टी चे व्रत करतात. असे जे गणपती बाप्पाचे भक्त आहेत यांच्यावर गणपती बाप्पा हे नेहमी प्रसन्न होतात.

मित्रानो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करून बघा तुम्हाला फरक हा नक्की जाणवेल. तसेच तुमच्या घरातील अडचणी या दूर होण्यास मदत होईल.तर आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण साधे आणि सोपे असे उपाय जाणून घेऊयात .

१)आयुष्यात ज्यांना खूप संकटे आलेली आहेत. त्यांची सगळी संकटे दूर करण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करून नंतर पुढील मंत्राचा जप करायचा आहे. “ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा” हा मंत्र तुम्ही संकष्टी चतुर्थीला तुमची गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर हा मंत्र १०८ वेळा म्हणायचं आहे. हा जपताना तुम्ही एक उदबत्ती लावा आणि हा मंत्र म्हणून झाल्यावर त्या उदबत्तीचा अंगारा तुम्ही तुमच्या कपाळाला लावा आणि तुमच्या घरातील सगळ्यांना लावा.हा उपाय केल्यास पुढच्या संकष्टी पर्यंत तुमची संकटे दूर होतील.

२)मित्रानो तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमच्या ज्या अडचणी आहेत, त्यांच्या बद्दलची जी चिंता आहे , मुलं जर अभ्यासात खूप कच्चे असतील किंवा त्यांच्या नोकरी बद्दल जर चिंता असेल तर तुम्ही या संकष्टी चथुर्तीला आपल्या घरावळच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करावी. गणपती बाप्पाना लाल फुल वाहावे आणि मंदिरात बसून अथर्वशीर्ष वाचावे. तुम्हाला जर ते वाचता येत नसेल तर मोबाईल मध्ये लावून ऐकावे असं केलं तरी चालत. हा उपाय देखील केल्यास तुम्हाला पुढच्या संकष्टी चतुर्थी पर्यंत तुमच्या मुलांच्या अडचणी ह्या नक्की दूर होण्यास मदत मिळेल.

तुमच्या मुलांना देखील गणपती बाप्पाना नमस्कार करायला सांगा आणि अथर्वशीर्ष हे तुमच्या मुलांना वाचायला शिकवा. गणपती बाप्पा हे विद्देचे देवता आहेत त्यामुळे मुलांना गणपती बाप्पाना दररोज नमस्कार करायला सांगा.

३)मित्रानो बऱ्याच जणांच्या घरात पैसा हा येत नाही आणि आला तर तो स्थिर राहत नाही.तर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करताना एक लाल कापड घेऊन त्यावर एक नारळ आणि एक सुपारी ठेवावी. गणपती बाप्प्पाची मनोभावे पूजा करा आणि पूजा झाल्यावर गणपती बाप्पाना प्रार्थना करा आणि तुमच्या पैश्या संबंधीची अडचण सांगा आणि ती सुपारी आणि नारळ हे त्या लाल कपड्यात बांधून तुमच्या कपाटात तेव्हा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवता त्या जागी ठेवा . तसेच “ओम गं गणपतये नमः”हा मंत्र म्हणायचा आहे.

मित्रांनो आजच्या लेखातील माहिती आवडली असेल तर हि माहिती तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला शेयर करा. तसेच कंमेंट मध्ये ” गणपती बाप्पा मोरया ” लिहायला विसरू नका.धन्यवाद…