वास्तुशास्त्रा

घरातील वातावरण आनंदमयी व ऐश्वर्य पूर्ण राहण्यासाठी स्वामींनी सांगितलेले हे नियम नक्की पाळा

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपल्या घरात वातावरण आनंदमयी राहण्यासाठी करावयाचे उपाय आपण जाणून घेणार आहोत.

१)कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर पाण्याच्या मठाकडे क्षणभर तर्क लावून पाहावे आणि मगच बाहेर पडावे, कामात यश मिळते.
२)घरातील पंख्याच्या चालू असताना खडखड आवाज होत असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावा.
३)बेडरूम मध्ये दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके करूनच झोपले पाहिजे. अशाप्रकारे झोपल्याने मनःशांती लाभते सकाळी झोपून उठल्यावर ताजेतवाणे वाटते.
४)आहारात दुधाऐवजी शक्य तिथे दह्याच्या समावेश करावा, मटण, दारू किंवा तेलकट पदार्थ शक्यतो कमीत कमी खावेत.
५)सूर्यदयापूर्वी उठून अंगण स्वच्छ झाडून घ्यावे.

६)कापलेली भाजी कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. मळलेल्या कपड्यांत धुतलेले कपडे मिसळू नयेत.
७)महत्वाचे कागदपत्र दस्तावेज, कोर्टीच्या फायली नेहमी उत्तरेला दिशेला उघडणाऱ्या कपाटात ठेवाव्यात.
८)दरवाजा उघडताना व बंद करताना त्याचा करकर आवाज होऊ नये, याची काळजी घ्यावी.
९)प्रफुल्लित, आनंददायक वातावरणासाठी रात्री झोपताना सौम्य सुगंधाचा सेंट, अगरबत्ती, सुगंधित फुले यांचा वापर करावा.
१०)पाण्याने भरलेला जग किंवा ग्लास टेलीफोनजवळ मोबाईलजवळ कधीही ठेवू नये.
११)आपल्या आराध्य दैवताचा रोज स्मरण करावे.

१२)रोज सायंकाळी आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ दिवा लावा.
१३)घरातील सजावट पडद्याचे रंग आपल्या राशीला अनुकूल ठेवावेत.
१४)घरातील ईशान्य कोपरा मोकळा व स्वच्छ ठेवावा.
१५)जेवण नेहमी पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे, दक्षिणेला तोंड करून कधीही जेवू नये.
१६)तिजोरी किंवा कपाटाचे तोंड उत्तरेकडे उघडणारे असावे.
१७)घरासमोर कचऱ्याच्या ढीग किंवा सांडपाणी साठू देऊ नये.
१८)नैऋत्य कोपरा नेहमी जाड वस्तूने भरलेला ठेवावा. हा कोपरा कधीही रिकामा ठेवू नये.
१९)ईशान्य कोपऱ्यात देवघर असावे.

२०)पाण्याचा साथा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावा.
२१)पाणी नेहमी बसून पूर्वेकडे व पश्चिमेकडे तोंड करून प्यावे.
२२)शृंगार कक्ष नेहमी नौऋत्य कोपऱ्यात असावा आणि उत्तरेकडे तोंड करून कपडे घालावेत.
२३)स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात असावे. आग्नेय हि अग्नी देवतेची दिशा आहे.
२४)स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असेल तर ताणतणाव वाढतात, भांडणे अबोला वाढतो.
२५)दक्षिणेकडे पाय करून झोपू नये ती यमाची दिशा आहे.

वास्तुशास्त्रातील ह्या नियमांचे पालन केल्यास घरात सुख, समाधान, समृद्धी नक्कीच येईल. तसेच शांत, सुसंस्कृत एकोप्याचे वातावरण राहील. पती पत्नी संबंध आयुष्यभर टिकून राहतील. मित्रांनो शेवट कंमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहण्यास विसरू नका. तसेच हा लेख तुमच्या मित्रकुटुंबपरिवारा नक्की शेयर करा. धन्यवाद.