धार्मिक

पाच सवयी अवश्य लावून घ्या. जरी तुम्ही देव पूजा केली किंवा नाही केली तरी चालेल.

सध्याच्या काळात रोज देव पूजा केली जाईल असे नाही. बऱ्याच ठिकाणी रोजच्या ऑफिस वेळा मुळे सुद्धा आपला सकाळी वेळ मिळेल असे नाही. त्यामुळे सुद्धा देव पूजा होत नाही. अशा वेळी आपल्या सर्वाना एक प्रश्न नक्की येईल कि आपण आपले नशीब कसे बदलावे किंवा देवांची सेवा कशी करावी यासारखे अनेक प्रश्न आपल्याला येतात. आपल्या मनात इच्छा खुप असते देव पूजा करण्याची किंवा देवाची आराधना करण्याची आपण रोजच्या धावपळीच्या कामामुळे हे काही शक्य होत नाही.

अशा वेळी काही अशा सवयी आहेत. ज्यांचे आपण पालन अवश्य केले पाहिजे. यामुळे सुद्धा आपल्या हातून सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी घडतात. आणि त्याचे लाभ आपल्याला मिळतात. अशा कोणत्या सवयी आहे ज्या आपण अंगीकार केल्या पाहिजेत ज्या मुळे आपल्याला अनेक लाभ होऊ शकतात. हे आजच्या लेखात जाणून घेणार होत.

यातील पहिली सवय आहे ब्रम्ह मूर्तावर उठणे हिंदू धर्मातील शास्त्रा नुसार ज्या घरातील व्यक्तीरोज सकाळी लवकर उठतात. त्या घरात माता लक्ष्मी वास करते. ज्या घरात उशिरा उठणे होत असते. सूर्य उदय झल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळ लोक तसेच अंथरुणात झोपून रहातात अशा घरात माता लक्ष्मीचा वास खुप कमी काळ असतो. आणि ज्या घरात माता लक्ष्मी रहात नाही त्या घरात गरिबी येत रहाते.

त्यानतंर घरातील महिलांनी ज्या वेळी आपण अन्न शिजवण्यासाठी स्वयंपाक घरात जातात. त्यावेळी तुम्ही प्रथम ज्या शेगडी वर अन्न शिजवणार आहात त्या शेगडीला नमस्कार करून नंतर त्यावर अन्न शिजवावे. तसेच आपले अन्न शिजवून पूर्ण झाल्यावर अन्न ग्रहण करण्याधी गोमातेला, घरातील पाळीव प्राण्यासाठी किंवा कवल्यासाठी काही अन्न कढून ठेवावे आणि नंतर आपण सेवन करावे.

त्याच सोबत बऱ्याच लोकांना रोज देवपूजा करणे शक्य नसते अशा वेळी आपण आपले कुलदैवत कोणते आहे याबद्दल माहिती काढून घ्या. त्यानतंर त्याचा वर कोणता आहे याची माहिती जाणून घ्या आणि कमी कमी त्या दिवशी तुम्ही देवपूजा करू घ्या आणि त्या इष्ट देवांचा जप काही वेळ करत जा. जर का तुम्हला तुमचे कुलदैवत माहित नसेल तर ज्या देवाची तुम्ही आराधना करतात त्या देवांचा वर कोणता आहे याबद्दल माहिती जाणून जि दिवशी त्यांची सकाळी लवकर उठून त्यांची उपासना आणि आराधना करा.

प्रत्येक रोज जर का वेळ देणे होत नसेल तर कमी कमी एक दिवस नक्की देवांसाठी द्या. आठवड्यातून एक दिवस मनापसून देवाची आराधना करा त्यादिवशी आपल्या कुलदैवताची उपासना करून जप करा यामुळे सुद्धा तुम्हला अनेक लाभ होतात. कोणत्याही देवाची उपासना मनापसून केली कि त्याचे फळ आपल्याला अवश्य मिळते. जरका तुम्ही असे केले तर त्याचे लाभ तुम्हला नक्की भिविष्यात मिळतात.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद