धार्मिक

२८जुलै ,दीप अमावसेच्या दिवशी दिवा लावताना म्हणा हा मंत्र इच्छा होतील पूर्ण …

आषाढी अमावस्या या अमावस्येलाच दीप अमावस्या असे म्हणतात . या अमावसेलाच आपण दिवे स्वच्छ करून आपण त्यांची दिव्यांची पूजा करतो. या वर्षी दीप अमावसेची सुरुवात २७ जुलै ला रात्री ९वाजून ११ मिनिटांनी होते आणि २८ जुलै ला रात्री ११ वाजून २४ मिनिटांनी होत आहे. त्यामुळे आपण २८ जुलै लाच दीप अमावस्या साजरी केली जाईल . या दीप अमावस्येनंतर आषाढ महिना संपून श्रावण महिन्याची सुरुवात होते.या दीप अमावस्येनंतर आषाढ महिना संपून श्रावण महिन्याची सुरुवात होते, म्हणूनच या दीप अमावस्या आपण ‘दीपान्वित अमावस्या” असे म्हणतात.

दीप अमावस्याचे दिवशी आपण तुळस, केळी ,वड , पिंपळ हि झाडे लावण्यात येतात, तसेच हा दिवस या झाडांच्या लागवडीसाठी चांगला मानला जातो . काही जण असे म्हणतात कि या दिवशी झाडे लावल्याने आपल्या पूर्वजांना शांती मिळते. त्यामुळे अनेक स्वसथा या दिवशी वृक्षा रोपं करतात. तसेच अनेक जण भेट म्हणून झाडे भेट म्हणून देतात.

आपल्या सस्कृतीत संध्याकाळी देवा समोर आणि तुळशी समोर दिवा लावला जातो. त्यामुळे दिव्याची ज्योत हि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तसेच दीप अमावस्येच्या दिवशी वरती ठेऊन दिलेले काढून ते स्वच्छ करून ते सायंकाळी लावले जातात. तसेच काही जण आपल्या पूर्वजाना शांती मिळावी म्हणून पुरण तसेच गोडाचा नैवेद्य करतात आणि या दिवशी कणकेचे दिवे सुद्धा करतात.या दिवशी सायंकाळी देवासमोर पाट मांडून त्यावर स्वच्छ केलेले दिवे मांडतात. त्या दिव्यांत वात घालून तसेच तेल भरून ठेवले जातात आणि त्या दिव्याला फुल वाहून आणि दिव्याला गोडाचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.

या दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते पूजा करून दिवे लावताना हा मंत्र म्हणावा , “दीप सूर्याग्निरूपसत्व तेजस: तेज उत्तमम ! गृहण मत्क्रुता पूजा सर्व कामप्रदो भाव:!!” हा मंत्राचा अर्थ असा आहे ,हे दिव्या तू सूर्य सारखा आहेस ,तू तेजामध्ये तेजा सारखा आहेस माझ्या पूजेचा स्वीकार करून मला सुख शनी मिळू दे आणि माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे असा या मंत्राचा अर्थ आहे.

भारतीय संस्कृतित दिव्याला खुप महत्व दिले गेले आहे. आपल्या घरातील इडापिडा टाळण्यासाठी, घरातील वाईट गोष्टींचा नाश होण्यसाठी दीप प्रज्वलित करून ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र जावा यासाठी दिवे लावावे असे आपल्या संस्कृतीत संगितले गेले आहे. त्याच सोबत आषाढी अमावस्याच्या दिवशी पितृ दर्पण सुद्धा बरेच लोक करतात. तसेच दर्पण दण्यसाठी पुरणाचा नैवेद्य सुद्धा दाखवतात. या मुळे आपल्या पितृना मुक्ती मिळते आणित्यामुळे त्यांचेआशीर्वाद आपल्या पाठीशी राहतात.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.