सातू खाण्याचे गुणकारी फायदे. , Medicinal benefits of eating satu
आरोग्य

सातू खाण्याचे गुणकारी फायदे.

खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. सातूचे पीठ बाजारात सुद्धा सहज रित्या मिळते. किंवा तुम्ही सातूचे पीठ घरी सध्या तयार करू शकतात. सर्वाना प्रश्न येत असेल सातू म्हणजे नेमके काय?. तर आपण आज सातूचे पीठ’कसे तयार करायचे आणि सातू खाण्याचे फायदे काय आहे, याबद्दल जाऊन घेणार आहोत.

आपल्या आहारात अनेक घटक खुप मत्वाची भूमिका बजावत असतात. पण बऱ्याच लोकांना आपल्या शरीराला लागणारे पोषक घटक आपल्या रोजच्या आहारातून मिळत नसतात. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांना समोरे जावे लागते. जर का आपले शरीर योग्य साथ देत नसेल तर आपले मानसिक आरोग्य सुद्धा चांगले रहात नाही.

गुणकारी सातू तयार करण्याची पद्धत.

सातू खाण्यामागे हे मुख्य कारण आहे कि कमी आहारातून सुद्धा अनेक पौष्टिक लाभ आपल्या शरीराला मिळत असतात. सातूचे पीठ हे अनेक पौष्टिक घकांपासून तयार झालेले असते. सातूचे पीठ तयार करण्यसाठी गहू, हरबऱ्याची डाळ किंवा डाळव (भाजून घेणे ), काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, सुंठ, इलायची, जिरे, हे सर्व घटक हे लालसर होईपर्यं भाजून घ्याचे आहे. फक्त ड्रायफुड हे आवडी नुसार टाकायचे आहे.

या सर्व गोष्टी आपल्या मिक्सर मधून बारीक केले तरी चालेले किंवा दळून आणले तरी चालते. याचे सेवन आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये करण्यास सुरवात करायची आहे. सातूचे पीठ हे वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करायचे आहे. जसे कि तुम्ही दुधामधून किंवा कोमट पाण्यातून याचे सेवन करायचे आहे. रोज सकाळी सातूचे सेवन केल्यास त्याचे लाभ खुप चांगल्या प्रकारे मिळते.

सातू खाण्याचे फायदे.

सातू मध्ये बऱ्याच प्रमाणत पोषक घटक असतात त्यामुळे जर तुम्हला अशक्त पण वाटत असेल, तर नक्की सातूचे सेवन करा यामुळे तुम्हला ऊर्जा मिळेल. शरीरात ऊर्जा चांगल्या प्रकारे असल्यास आपल्या काम करण्यासाठी उत्साह निर्माण होईल.

सातू मध्ये अनेक प्रकारचे गुणकारी घटक असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. जसे कि प्रथिने, कर्बोदके, कॅलरीज, सोडियम, मॅंगनीज या सारखे शरीरासाठी लागणारे महत्वाचे घटक त्यात असत. यामुळे सातू खाल्याने अनेक पौष्टिक घटक आपल्या शरीराला मिळत असतात.

सातू मध्ये अनेक उच्च प्रकारचे फायबर असते. त्यामुळे शरीरातील इन्सोल्युबल प्रमाण चांगले राहते. यामुळे पचन क्रिया चांगली होते तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा कमी होतो.

संधिवात यांची लक्षणे कमी करण्यास मदत होते कारण सातूमध्ये तांबे प्रमाण चांगल्या प्रकारे असते. तांबे मुक्त रॅडिकल्सला न्यूट्रल करते यामुळे आपल्या शरीरातील पेशींचे नूतनीकर होण्यास मदत होते.

रक्तदाब असलेल्या लोकांनी सातूचे सेवन केल्यास चांगले असते. तसेच सातूचे सेवन केल्यामुळे स्नायू बळकट होतात. त्याच सोबत सातू मध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण चांगले असल्यामुळे आपली रोगप्रितकार शक्ती चांगली बनते.

सातूमुळे आपल्या शरीराची चापचय प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते, त्यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होते. तसेच चरबी सुद्धा कमी होते तयामुळे वजन नियंत्रणात रहाते.

हे पण वाचा:- कॉफीच्या घगूती उपयापासून पाच दिवसात पोटाची चरबी कमी करा. वजन सुद्धा होईल कमी.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.