तुम्हला माहीत आहे का? मासिक पाळी आणि गर्भधारणा योग्य अंतर किती असते याबद्दल जाणून घ्या.,Menstruation and pregnancy proper interval
आरोग्य

तुम्हला माहीत आहे का? मासिक पाळी आणि गर्भधारणा योग्य अंतर किती असते याबद्दल जाणून घ्या.

महिलांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मासिक पाळी होय. या प्रक्रियेला आपण मासिक धर्म, पिरेड्स, किंवा पाळी असे म्हणतो. साधरणतः हि प्रक्रिया मुलींच्या १० ते १५ वयवर्षा मध्ये असताना सुरू होते. आणि प्रत्येक महिन्यात याची सायकल सुरु असते ती वय वर्ष ४५ ते ५० मध्ये समाप्त होते. मासिक पाळी बदल अनेक प्रश्न बऱ्याच मुलींना मोठे झाल्यावर सुद्धा येत असतात. अशाच काही प्रश्नाचे उत्तर देणायचे पर्यन्त लेखातून केले आहे.

वयात आलेल्या प्रत्येक मुलींना असा प्रश्न नक्की येत असतो कि मासिक पाळी का येत असते? प्रत्येक महिन्यात आलेल्या मासिक पाळीत रक्त स्तराव का होतो? असे प्रश्न मोठया झालेल्या मुलींना देखील येत असता. एवढी समज सर्वाना असते कि प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येत असते. तसेच ज्या महिन्यापासुन गर्भधारणा होते त्या महिण्यापासून मासिक पाळी येत नाही.

आजही बहुतेक जणांना मासिक पाळी बद्दल सविस्तर माहिती नसेल. कारण यावर आज सुद्धा चर्चा करणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे मासिक पाळी आणि गर्भधारणा यातील अंतर कसे समुजून घ्याचे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

मासिक पाळी आणि चक्र

मासिक पाळी मध्ये रक्त स्त्राव होतो म्हणजे काय? ज्यावेळी स्त्रीबीज तयार होतात पण ते फलित होत नाही. त्यावेळीस पेशी मधून बाहेर पडणाऱ्या रक्तस्त्रावाला आपण मासिक पाळी असे म्हणतो. सायन्स मध्ये त्याला मेन्स्ट्रूएशन असे म्हटले जाते. शक्यतो १० ते १५ वय वर्ष दरम्यान सुरू होणाया मासिक पाळीला मेनार्चे (Menarche) असे म्हंटले जाते तसेच महिलेच्या ४५ ते ५० या वया दरम्यान सपरणाऱ्य मासिक पाळीला रजोनिवृत्ती (menopause.) म्हणतात.

स्त्रियांमध्ये २८ ते ३२ दिवसांचे मासिकचक्र बऱ्याच जणांचे असू शकते. काही स्त्रियांमध्ये मासिकचक्र हे कमी जास्त दिवसांचे असू शतके. गर्भधारणेसाठी ओव्यूलेशनचा काळ समजून घेणे खुप महत्वाचे आहे. ओव्यूलेशनचा काळ हा पहिल्या दिवसा पासून दुसऱ्या महिन्यातील मासिक पाळी येणाऱ्या दिवसांच्या मधला असतो. यादिवस मध्ये गर्भधारणा रहाणायची खुप शक्यता असते.

मासिक पाळी येऊन गेल्यावर दहाव्या दिवसापासून पुढील पाच दिवसात संभोग केल्यास गर्भधारणा रहाण्यची शक्यता खुप असते. मासिक पाळीच्या अठावीस दिवसाच्या चक्रामध्ये प्रजनना साठी सर्वात चांगला दिवस १२, १३ आणि १४. यापैकी इतर दिवस प्रजनना साठी चांगले नाही किंवा गर्भधारण होत नाही असे नाही. ओव्यूलेशन होत आहे किंवा नाही हे हि आपल्याला समजू शकते.

गर्भधारणेवर परिणाम करणारे घटक

आईचे वय सुद्धा यामध्ये खुप महत्वाचे आहे. तिशी नंतर गर्भधारणा २५ ते ३० टक्क्याने कमी होण्याची शक्यता असते. तसेच चाळीशी नंतर आणखी कमी होते, त्यामुळे लवकर पर्यंत करावे. त्याच बरोबर मासिक पाळी मध्ये अनियमित्ता असेल तर ओव्यूलेशनचा दिवस समजून येण्यास थोड्या अडचणी येऊ शकतात.

वारंवार संभोग करण्यापेक्षा एक दिवसा नंतर संभोग करणे कधीपण चागले असते. तसेच एक वर्षापेक्षा जास्त काळ वारंवार संभोग करून देखील गर्भधारणा होत नसेल तर वैदकीय सल्ला अवश्य घ्यावा. तसेच दोघानपैकी कोणा ऐकाला काही आजारपण असेल तर अशा वेळी गर्भधारणेला काही समस्या येऊ शकतात. समस्या येईल असे सुद्धा नाही.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.