घरगुती उपाय

निसर्गाची किमया, कितीही तोंड येऊ दे मिळेल एका मिनटात अराम.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण तोंड येणे ह्यावर एक भन्नाट उपाय घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो तुमच्या घराजवळ कुठेतरी बाभळीचे झाड असेलच कि बाभळीत देखील खूप प्रकार असतात आपण ज्या झाडाबद्दल बोलत आहोत ती आहे गोडी बाभळ. ह्या बाभळीचे फक्त ३ ते ४ बोन्डे घ्याची आहेत, आता बोन्डे म्हणजे काय तर, ह्या बाभळीला पिवळ्या रंगाची फुले येतात आणि हि फुले येण्यापूर्वी जो काही भाग आहे त्या भागाला बॉण्ड असे म्हणतात तर अश्या प्रकारचे ३ ते ४ आपण बोन्डे घेऊन ति आपण चावून खायची आहेत.

जर तुम्हाला चव आवडत नसेल तर त्याचा रस फक्त पिऊन घ्याचा आणि उरलेला चोथा हा फेकून द्याचा. तुम्ही तोंडात जखम झाली असेल किंवा छाले पडले असतील किंवा अगदी जिभेवर टाळूवर जिथे तुम्हाला तोंड आलेलं असेल तज्यालाच इंग्रजीमध्ये माऊथ अल्सर असे देखील म्हणतात. असे कोणत्याही प्रकारचे तोंड अगदी एका दिवसात बरे होते. सकाळी दुपारी किंवा रात्री कधीही हा उपाय करा तरी चालेल.

तुम्हाला खूपच त्रास होत असेल तोंड आलेला दुखत असेल तर तुम्ही अगदी दिवसातून २ वेळा खाल्ले तरी चालेल, ह्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. हा उपाय आपण सलग तीन दिवस करावा जेणेकरून आपल्याला असे तोंड पुन्हा सारखे येणार नाही. अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला ह्या उपायाचा फरक पडेल. फक्त हा उपाय तुम्ही ३ दिवस करावा जेणेकरून तुम्हाला त्या समस्यांपासून कायमचा अराम मिळेल व भविष्यातही असे तोंड येणार नाही.

हा उपाय तर आपण पहिलाच मात्र आणखी एक गोष्ट मित्रांनो दररोज जेवताना आपण एक टोमॅटो नक्की खा, तुम्हाला तोंड येणार नाही. पाणी भरपूर प्या आणि ते नेहमी बसून प्यावे ते सावकाश प्यावे अगदी घटाघटा पिऊ नये. जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय लावा. आणि चहा असो किंवा कॉफि किंवा मसालेदार खाणे, बैठे काम जास्त वेळ करणे, झोप वेळेवर न घेणे अश्या सर्व गोष्टी करू नयेत. तुमचे कामच बैठे असेल तर तासातासाने पाय मोकळे करायचे आणि नंतर बसायचे. बस इतक्या गोष्टीचे पालन केले तर हा तोंडदुखीचा त्रास तुम्हाला अगदी जन्मात होणार नाही.

आपण जो उपाय सांगितला कि आपण हि बोन्डे चावून चावून खात आहोत त्यानंतर आपण लगेचच साधारण पणे अर्धा तास पाणी पियू नये, त्यानंतर तुम्ही पिऊ शकता. तर मित्रांनो आजचा उपाय कसा वाटलं तुम्हाला, आवडला असेल तर लाइक करायला विसरू नका तसेच असेच नवनवीन उपाय व माहितीसाठी आमच्या पेज ला फॉलो करा, धान्यवाद.