चिंटू बोल की आपल्यासोमर पेपर मध्ये येणारे चिंटूचे छोट्या व मजेशीर गोष्टी दिसतात. पण श्रीरंग गोडबोले यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट सर्वानी पहिला असेल. २०१२ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद दिला व त्या नंतर चिंटू-२ हं चित्रपट २०१३ ला प्रदर्शित झाला होता. त्या मधील चिंटू आणि त्याची कंपनी यांनी खुप करामती केल्या आहेत. त्या सर्वना खुप आवडल्या. त्यातील सर्व बालकलाकारानी चित्रपटामध्ये खुप धमाल घातली.
या दोनी चित्रपटात नेहाची व्यक्ती रेखा साकारणारी छोटीशी मुलगी सर्वां लक्षात असेल. ती छोटीशी मुलगी आता खुप मोठी झाली आहे. नेहाची भूमिका करणारी ती बालकलाकार म्हणजे “रुमानी खरे” आहे. तिने चिंटू चित्रपटातील दोन्ही भागात उत्तम काम केले आहे. तसेच प्रेक्षकाना सुद्धा आवडले होते. रुमानी हिने जवळपास ९ वर्षा पूर्वी आपल्या अभिनयाची सुरवात बालकलाकार म्हणून केली. त्यानतंर तिने बालभरतीच्या सोबत सुद्धा काम केले आहे.

रुमाली खरे हिने अभिनया सोबत कथ्थक चे सुद्धा प्रशिक्षण घेतले आहे. त्या आधी तिने अभिनव विद्याल आणि स. पी. कॉलेज मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच बरोबर तिने शिक्षण घेत असताना बऱ्याच एकांकिका तसेच नाटकात सुद्धा काम केले आहे. त्याच बरोबर विविध नाटकातून विविध भूमिका तिने केल्या आहेत. “आई पण बाबा पण” या नाटकात ती मुख्य भूमिकेत सर्वां समोर अली होती.
याच सोबत तुम्हला अजून एका गोष्ट ऐकल्यावर आनंद वाटली कि रुमाली खरे हि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांची ती मुलगी आहे. संदीप खरे यांच्या बदल सर्वना माहिती आहेच ते अभिनयासोबत एक उत्कृष्ट कवी आहेत. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या दोघानीची जोडी बरेच वर्ष झाले एकत्र काम करत आहेत. त्यांचे बरेच कार्यक्रम हे हाऊसफुल्ल असतात, तसेच संदीप खरे याचे कविता वाचन आणि वैभव जोशी सोबत ‘इर्शाद’ हा कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना आवडत आहे. संदीप खरे यांच्या इतक्या उत्कृष्ट कविता करतात त्याच प्रमाणे रुपाली सुद्धा एक उत्कृष्ट अभिनेत्री होईल यात शंखा नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.



