बॉलिवूड मधील कादंबरीवर आधारित चित्रपट. आंतरराष्ट्रीय लेखकांचे रुपांतर., Bollywood Movies Based On Novels.
मनोरंजन

बॉलिवूड मधील कादंबरीवर आधारित चित्रपट. आंतरराष्ट्रीय लेखकांचे रुपांतर.

आपण चित्रपट पहात आलो आहोत. कोणी मराठी तर कोणी हिंदी चित्रपट पहात असतात. काही काळा पूर्वी चित्रपट मधील कथा ठरविक गोष्टी भवती असत. पण आता नवीन चित्रपटा मध्ये काही पुस्ताका वरती व कादंबरी आधारित चित्रपटाची कथा लिहली जात आहे. त्या मध्ये फक्त भारतीय लेखकांनी लिहलेल्या कदंबरी शिवाय आंतरराष्ट्रीय लेखकांच्या कादंबरीवर पण सिनेमे काढले जात आहेत.

काही वर्षा पासून आपण पहात आलो आहोत कि मराठी सुद्धा काही चितपट हे कादंबरीवर आधारित असून त्या चितपटला सुद्धा प्रेक्षकांनी चागला प्रतिसाधं दिला आहे. मराठी त शाळा, दुनियादारी, शमीची आई, उत्तरायण या सारखे चित्रपट कादंबरीवर तयार केलेगेले आणि त्याना चागला प्रतिसाद दिला गेला. त्याच प्रमाणे हिंदी चितपटात सुद्धा काही चागल्या कादंबरीवर सिनेमे काढले गेले व त्याना बऱ्याच समीक्षकांनी त्याची स्तुती केली.

कादंबरीवर आधारित चित्रपट

१) हैदर:
कादंबरीवर आधारित चित्रपट
हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट बऱ्याच समीक्षकांनी चागला आहे असे संगितले. १९९५ ला काश्मीर मध्ये जो विद्रोह चालू होता त्या वेळेस तेथील नागरिकांना अपहन केले जायचे त्यावर हा चित्रपट आधारित होतात. हे शेक्सपियरच्या हेलमेट वर प्रेरित होत; या मध्ये मुख्य पत्राचे वडील मृत्यू पवल्यानंतर त्याची आई हि वडिलांच्या भावासोबत सोबत लग्न करते. या चित्रपटात शाहिद कपूर, तब्बू, केए मेनन आणि इरफान खान यांच्या अप्रतिम अभिनयाने हा सिनेमा खुप हिट झाला.

२) ओंकारः

Omkara, कादंबरीवर आधारित चित्रपट
हा सुद्धा चित्रपट विशाल भारद्वाज यांनी तयार केला होता. या सिनेमाची कथा ओथेलोपासून प्रेरित आहे. ओंकार या चित्रपटामध्ये सैफ अली खान, अजय देवगन आणि करीना कपूर याचं खुप चागल्या अभिनयाची झलक दिसून येते. हे गॅंग वॉर आणि ज्युनिअर गुंड मोठा डॉन बनण्यावरून झालेल्या भांडणावर आधारित आहे. या पात्रांनी शेक्सपियरच्या ओथेलोमधील आद्याक्षरे कायम ठेवली.

३) मकबूल:
Maqbool

मकबूल मॅकबेथपासून प्रेरित असून मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आहे. यात इरफान खान ने केलेल्या अभिनयाला खुप पसंती अली, त्याच सोबत पंकज कपूर ने डॉनची व्यक्ती रेखा पण खुप सुंदर होती. अब्बा जी नावाचा डॉन असतो आणि त्याच्या पत्नीच्या प्रेमात मकबूल असतो. फसवणूक , वफादारी , आणि जुनुन या आजूबाजूला फरणारी हि एका आदर्श अपराध नाटक आहे.

४) कोहरा:

हा चित्रपट १९६४ मध्ये प्रदर्शित झाला होतात. आणि डैफने डू मौरियर च्या हॉरर थ्रिलर कादंबरी रेबेकाचे रुपांतर होते. हि कथा नवविवाहित स्त्री च्या आजूबाजूस फिरत असते. आपल्याच पतीच्या पहिल्या पत्नीचे भूत त्यात असते.

५) लुटेरा:

Lootera, कादंबरीवर आधारित चित्रपट
हा रोमॅंटिक चित्रपट विक्रमादित्य मोटवानीयांनी दिगदर्शक केला आहे. हे नाटक पश्चिम बंगालमध्ये १९५३ ला सुरु झालं होत . हि कथा ओ. हेन्रीला द लास्ट लीफ यांनी प्रेरित केले आहे.

यातील तुम्ही कोणता चित्रपट पहिला आहे हे आम्हला कॉमेंट करून नक्की सागा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.