"नाच गं घुमा " मराठी सिनेमाला तुफान गर्दी
मनोरंजन

“नाच गं घुमा ” मराठी सिनेमाला तुफान गर्दी !!

“नाच गं घुमा ” हा मराठी सिनेमा १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित झालेला आहे.हा सिनेमा परेश मोकाशे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी मालकीण बाई आणि मोलकरीण बाई वर हा सिनेमा बनवलेला आहे,म्हणजेच सिनेमा वर्किंग वूमन आणि होमी वर्किंग वूमन यांच्या केमिस्ट्रीवर सादर केलेला आहे.

“नाच गं घुमा ” या सिनेमात मुक्ता बर्वे,नम्रता संभेराव,सारंग साठ्ये ,मायरा वायकुल,सुकन्या मोने,सुप्रिया पाठारे,शर्मिष्ठा राऊत ,सुनील अभ्यंकर ,मधुगंधा कुलकर्णी हे सगळे कलाकार या सिनेमात आहेत. तसेच हा सिनेमा परेश मोकाशे यांनी दिग्दर्शित केला आहे. स्वप्नील जोशी ,मधुगंधा कुलकर्णी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी निर्मिती केलेली आहे. हा सिनेमा खूप कॉमेडी आहे.

“नाच गं घुमा ” ह्या सिनेमात दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन हा सिनेमा बनवलेला आहे. तसेच रोजच्या दोन अश्या व्यक्तिरेखांवर प्रथमच असा सिनेमा बनवलेला आहे.या सिनेमामध्ये प्रत्येक वर्किंग वूमन ला आपलंच प्रतिबिंब दिसलं असेल.तसेच या सिनेमात मोलकरीण हि सुद्धा एक वर्किंग ओमेनच आहे असं दाखवण्यात आलेले आहे.तसेच या सिनेमातली गाणी आणि संगीत खूप चांगलं आहे.

“नाच गं घुमा ” हा सिनेमा वर्किंग वूमन म्हणजेच मुक्ता बर्वे हि आहे .ती बँकेत नोकरी करत असते.तसेच तिला योगाची देखील खूप आवड असते.वर्किंग वूमन हि नोकरी करून तिचे घर सांभाळत असतेअसे या सिनेमात दाखवलेले आहे. तसेच मुक्ता बर्वे हिने हि भूमिका खूप चांगली साकारलेली आहे.

“नाच गं घुमा “या सिनेमात मोलकरीण हि विनोदी व्यक्तिरेखा साकारणारी आणि तुमच्या सगळ्याची लाडकी नम्रता संभेराव हि आहे. नम्रता संभेराव हिने मोलकरीण बाईची भूमिका खूप छान पार पडली आहे. तसेच ती प्रेक्षकांना खूप जास्त आवडली आहे.ह्या सिनेमात तीच नाव आशाताई आहे.

आशाताई हि राणीची जीन असते.आशाताईला नेहमी कामला उशीर होत असतो आणि त्या फोन उचलत नाहीत या वरून मालकीण आणि मोलकरीण याचा सतत वाद हा होत असतो असं या सिनेमात दाखवलेलं आहे. तसेच एकदा त्या दोघींचा खूप वाद होतो आणि राणी हि आशा ताई ला कामावरून काढून टाकते असं या सिनेमात दाखवलेलं आहे आणि या नंतर खरा सिनेमा चालू होतो.

या सिनेमा आपल्याला खूप काही शिकवून जातो कि आपल्या घरात जी कामासाठी बाई येते त्यांना आपण “कामवाली बाई” ना म्हणता त्यांना आपण मावशी ,ताई , काकू असे देखील म्हणू शकतो. त्यामुळे त्यांना हि आनंद वाटेल. त्या आपल्या घरी कामासाठी येतात तर त्याच्या मनाचा विचार हा आपण केला पाहिजे अशी चांगली शिकवण या सिनेमात मिळाली आहे.

त्यामुळे प्रत्येकानी हा सिनेमा जाऊन बघितला पाहिजे. तसेच हा सिनेमा सध्या सगळ्या प्रेक्षकान खूप आवडत आहे. तसेच या सिनेमासाठी खूप गर्दी हि वाढत आहे.तर मित्रानो तुम्ही देखील नक्की ह्या सिनेमाचा आनंद घ्यावा.