महाशिवरातीच्या दिवशी करा हे कार्य
धार्मिक

१८ फेब्रुवारी २०२३ महाशिवरात्री या दिवशी अर्पण करा शिवलिंगावर यापैकी एक वस्तू मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.

येत्या शनिवारी १८ फेब्रुवारी २०२३ हि तारीख असून या दिवशी महाशिवरात्री आहे. या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर शिवलिंगार यापैकी एखादी वस्तू अवश्य महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलींगावर अर्पण करावी. येणाऱ्या काळात नक्कीच तुमच्या मनातील एक तरी इच्छा पूर्ण होताना दिसून येईल.

आज आपण असे अनेक प्रकारचे उपाय पहाणार आहोत ज्या मध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होताना दिसणार आहेत. जसे कि ज्या घरात सतत भांडणे होतात. ज्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य जास्त काळ टिकत नाही. तसेच घरात सतत कोणी कोणी आजारी पडत आहे. आणि ज्या व्यक्तींना आपले नशीब साथ देत नाही अशा लोकांच्या अडचणी दूर होऊन त्यांचे नशीब चमकू लागेल. वरील सर्व अडचणी दूर करण्यसाठी कोणकोणते छोटे छोटे उपाय महाशिवरात्री दिवशी करावेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

अनेकांच्या मनात अनेक इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यसाठी आपण अनेक मार्ग निवडतो तरी सुद्धा त्या इच्छा लवकर पूर्ण होत नाहीत. मनातील इच्छा लवकर पूर्ण व्हावी असे जर तुम्हला वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलींगावर जल अर्पण करावे. आणि त्यासोबत ” ओम नमःशिवाय ” या मंत्राचा जप करावा त्याच सोबत काळ्या मिरीचा एक दाना आणि सात काळे तीळ घेऊन महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगार अर्पण करावे यामुळे आपल्या मानतील इच्छा काही दिवसात नक्की पूर्ण होताना तुम्हला दिसून येईल.

ज्या घरात सतत भांडणे होतात. अशा लोकांनी गव्हाच्या सात ओंब्या घ्याव्यात. त्या संपूर्ण घरात फिरवाव्यात आणि जवळच्या शिव मंदिरात जाऊन महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगार घरातील मोठ्या किंवा कर्त्या व्यक्तीनी आपल्या गोत्राचे उच्चार करून शिवलिंगार अर्पण कराव्यात. यामुळे घरात ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या पूर्ण पणे निघून जातील तसेच घरात सतत आजारी पडणे सुद्धा कमी होईल.

असे अनेक व्यक्ती असतात. त्याचे भाग्य लवकर उजळत नाही. कारण त्यांचे नशीब त्याना साथ देत नाही. अशा व्यक्तीनी महाशिवरात्रीच्या दिवसा पासून महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेणे आणि मंदिरच्या बाहेर पडताना मंदिराच्या उबारा उजव्या हातानी स्पर्श करून आपल्या कपाळाला लावावा. असे काही दिवस सतत केल्यास आपले भाग्य नक्कीच बदलताना तुम्हला दिसेल.

काही व्यक्तींचे खुप महत्वाचे काम अडले असेल. तसेच काम पूर्णत्व होण्या आधीच काहीतरी अडचणी येत असेल. प्रत्येक चांगल्या कामात अडचणी येत असतील. महत्वाची कामे पूर्ण होत नसतील. अशा वेळी उजव्या हातावरी एक बेलपत्र घेऊन त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेऊन. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर डाव्या हातात कलश घेऊन उजव्या हातातील बेलपत्र शिवलींगावर अर्पण करावे आणि त्यानंतर कलशातील जल हे शिवलिंगार अर्पण करावे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.