धार्मिक

देवघरात एकापेक्षा जास्त देव असतील तर कोणत्या देवाची आरती म्हणावी कोणालाच माहित नाही.

आपले देवघर आपले श्रद्धा स्थान असते. आपण रोज देवांची पूजा करतो व देवाची आराधना करत असतो. त्या ठिकाणी आपले श्रद्धा स्थान असते, त्या ठिकाणी आपण खुप लक्ष देऊन त्याची सजावट करतो, कारण प्रसन्नता यावी म्हणून. तसेच पण त्या देवघरात सर्व किंवा आपली श्रद्धा आलेले देवांची मूर्ती किंवा पतिमा ठेवत असतेत. त्याची रोज पूजा करून वार्त करत असतो.

देवघरात कोणत्या देवाची मूर्ती असावी असे कोणतेही बंधन नसून त्या ठिकाणी आपली श्रद्धा महत्वाची असते. पण खुप लोकांच्या मते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतची मूर्ती किंवा प्रतिमा असावी. आपण सर्वी देवांची पूजा करावी किंवा आपली श्रद्धा असलेले देव यांचीपूजा केली तरी चालेल पण आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतीची मूर्ती किंवा प्रतिमा जरूर असावी. तसेच वर्षातुन एकदा तरी आपल्या कुलदेवतेला जाऊन यावे.

पण सर्वाना एक प्रश्न येत असेल कि आपण रोज देवांची पूजा केल्यावर कोणत्या देवाची आरती करायची तसेच आपण रोज जी आरती करतो ती आरती योग्य आहे का नाही. आपल्या शात्रात संगितल्या प्रमाणे “आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||” म्हणजेच आकाशातून पडणारे पाणी नंतर समुद्रात जाऊन मिसळते किंवा समुद्रात जाऊन मिळते, तसेच कुठल्याही देवाला आपण नमस्कार केला तरी तो श्रीहरी (कृष्ण ) ला जातो.

त्यामुळे तुम्ही श्रीहरी ची आरती कारवी किंवा तुम्ही रोज आपल्या कुलदैवतेची आरती केली तरी चालेल. कुठल्याही देवाची आरती करा पण श्रद्धेने करावी कारण देव एकच असतो. देवाला आपली पमाणिक श्रद्धा महत्वाची असते. जो प्रामाणिक पणाने व श्रद्धेने सत्त सेवा करतो त्याठिकाणी सदैव सुख, समृद्धी आणि धन याची कमी कधीच पडणार नाही.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.