बऱ्याच ठिकणी आपण फिरायला जातो त्यावेळेस आपल्याला हॉटेल, किंवा दुकानात, मॉल मध्ये पळणाऱ्या सात घोड्यांचा फोटो आपल्याला दिसतो. तसेच आपण आपल्या नातेवाईक यांच्या घरी जातो त्या ठकाणी सुद्धा सात धावणाऱ्या घोड्यांचा फोटो असतो. या घोड्यांचे चित्र लावण्याच्या मागे कोणते कारण आहे, हे तुम्हला माहित आहे का? फक्त दिसायला चांगले आहे म्हणून लावले जातात का? का त्यामागे कोणते अजून दुसरे कारण आहे हे आज जाऊन घेणार आहोत.
प्रत्येकाला एक अनुभव नक्की आला असेल जरका आपल्या शरीरात ऊर्जा असेल तर आपण कोणतेही काम करण्यासाठी मागे सरकत नाही किंबहुना आपल्यात ऊर्जा असेल तर कोणतेही काम असो ते पण पूर्ण करतो. आपल्या शरीरात परिपूर्ण ऊर्जा असेल तर प्रत्येक कार्य किंवा काम आपण पूर्ण करण्याची शक्ती आपल्यात असते. त्याच सोबत आपण प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ शकतो.
घरात पळणाऱ्या सात घोड्यांचा फोटो का लावतात?
याच प्रकारे घोड्याच्या शरीरात परिपूर्ण ऊर्जा असते. ऊर्जेचे प्रतीक म्हणजे घोडा होय. घोड्यामध्ये इतकी प्रचंड ऊर्जा त्यात असते कि तो झोप सुद्धा उभ्याने घेतो.घोडा खुप कमी वेळेस खाली बसतो. तो कधीच थकत नाही. तुम्हला एक अनुभ नक्की आला असेल प्रतेक्षात पळणारा घोडा पहिला कि आपल्या स्पुर्ती लगेच येते. वास्तूशास्त्र नुसार पळणाऱ्या सात घोड्याचा फोटो घरात, ऑफिस मध्ये किंवा दुकानात लावल्यास आपल्याला चंगली प्रगती मिळते.
घोड्यांचा फोटो लावणे म्हणजे ते प्रगतीचे आणि ऊर्जाचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे व्यवसायची प्रगती होण्यसाठी सात घोड्याची प्रतिमा लावणे खुप शुभ मानले गेले आहे. त्याच बरोबर सर्वांसाठी सर्व आकडे शुभ असतील असे नाही. पण सात हा आकडा सर्वांसाठी शुभ मानला गेला आहे. म्हणूच सात घोड्यांचा फोटो लावणे शुभ मानले गेले आहे.
पांढऱ्या सात घोड्यांचा फोटो सर्वांसाठी शुभ असतो.
सप्त ऋषी, इंद्रधनूष्य मध्ये सात रंग असतात आणि लग्नात सुद्धा सात फऱ्या घेतल्या जातात. सात हा नंबर सर्वंगिक विकास करणारा आहे. त्यामुळे सात पळणाऱ्या घोड्यांचा फोटो हा व्यवसायाच्या ठिकाणी दक्षिण दिशेला लावावा . त्याच सोबत एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी क्रोधीत असलेले घोडे कधीही घेऊनये. त्याच बरोबर कोणावर धावून जात आहे असे वाटणारे घोडे सुद्धा कधी घेऊनये.
धावणाऱ्या घोड्यांचा फोटो सतत डोळ्यासमोर ठेवल्याने आपल्याला सुद्धा ऊर्जा आणि आपल्यात काम करण्याच्या पद्धतीत गती प्राप्त होते. तसेच आपल्याला नेहमी पैशांची तंगी जाणवत असेल तर असा फोटो आपल्या घरात जरूर लावावा. यामुळे आर्थिक स्थिती चांगली होऊन हातात खेळता पैसा रहात रहातील. तसेच आपल्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य कायम स्वरूपाचे रहातील.
हे पण वाचा: तुम्हला माहीत आहे का? मासिक पाळी आणि गर्भधारणा योग्य अंतर किती असते याबद्दल जाणून घ्या.
घरात दक्षिण भिंतीला लावून घरात घोडे प्रवेश करत आहेत असा फोटो लावावा. शक्यतो पांढरे घोडे असलेला फोटो लावावा. पांढरे घोडे हे ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे. म्हणून घरात आणि ऑफिस मध्ये पांढऱ्या घोड्याचा फोटो लावल्यास नकारात्म ऊर्जा बाहेर पडून सकारत्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते. तसेच कर्जत जास्त प्रमाणात वाढत असेल तर वायव्य दिशेला दोन घोड्यांचा जोडप्याच फोटॊ लावावा. सर्वात महत्वाची गोष्ट ज्या फोटो मध्ये घोडे वेग वेगळ्या दिशेला पळत आहे असा फोटो कधीही घरात किंवा ऑफिस मध्ये लाऊनये.
टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.



