आरोग्य

घराच्या मुख्य दरवाज्यावर हि वस्तू लावा,लक्ष्मी नेहमी प्रसन्न होईल…

मित्रानो मुख्य दरवाजा हा घराचा अगदी महत्वाचा भाग आहे.मुख्य दरवाजा हा घरातील ऊर्जेचे स्थान असते.आपण नवीन घर घेताना सुद्धा मुख्य दरवाजा हा योग्य दिशेला आहे का नाही हे पाहत असतो, म्हणजेच मुख्य दरवाजा हा योग्य असला पाहिजे.तसेच मुख्य दरवाजातूनच सुख समृद्धी आणि लक्ष्मी घरात प्रवेश करत असते.

घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे.त्यामुळे घरात प्रवेश करताना खूप प्रसन्न आणि उत्साही वाटते. घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच ठेवल्याने घरात नकारात्मक येत नाही.घरात नेहमी आनंदी वातावरण निर्माण होते.

मित्रानो आता आपण घराच्या मुख्य दरवाज्यावर कोणत्या वस्तू लावाव्यात म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होईल,याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही ह्या वस्तू लावून बघा तुम्हाला फरक जाणवेल. तर या वस्तू कोणत्या आहेत ते खालीलप्रमाणे बघुयात.

आपल्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक हे काढले पाहिजे.हिंदू धर्मात स्वस्तिक हे खूप शुभ मानले जाते .स्वस्तिक हे सुख ,समृद्धी,शक्ती आणि मंगलाचे प्रतीक मानले जाते.स्वस्तिक हे गणपतीचे रूप देखील मानले जाते,असे आपल्याला ऊर्जा देणारे स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाज्यावर काढलेच पाहिजे.

घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे.स्वस्तिक हे नेहमी कुंकवाने काढले पाहिजे .स्वस्तिक काढल्यावर त्याच्या दोन्ही बाजूला दोन-दोन उभ्या रेषा काढल्या पाहिजेत.स्वस्तिक मध्ये चार बिंदू हे नक्की काढावेत.

मित्रानो घराच्या मुख्य दरवाज्यावर शुभ – लाभ काढणे खूप शुभ जाते.शुभ लाभ हे नेहमी दरवाज्याच्या दोन्ही बाजूला काढावे. शुभ-लाभ हे गणपतीचे प्रतीक मानले जाते.शुभ-लाभ घराच्या मुख्य दरवाज्यावर काढल्यावर आपल्या घरात शुभ गोष्टी घडू लागतात.त्यामुळे घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला शुभ-लाभ हे काढले पाहिजे.

मित्रानो घरच्या मुख्य दरवाज्यावर ओम किंवा त्रिशूल चे चिन्ह काढणे सुद्धा खूप शुभ मानले जाते.घराच्या मुख्य दरवाज्यावर जर त्रिशूल किंवा ओम काढले तर घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते.आपण घरातून बाहेर जाताना जर त्रिशूल किंवा ओम या चिन्हाला जर माघून बाहेर गेलो तर आपली सगळी कामे पूर्ण होतात आणि जी काही अपूर्ण राहिलेली कामे आहेत ती पूर्ण होण्यास मदत मिळते.

घराच्या मुख दरवाज्यावर नेहमी छोट्या छोट्या घंट्या लावाव्यात,असे केल्यास त्या घंटीच्या आवाजामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही.तसेच मुख्य दरवाज्यावर सूर्याची प्रतिमा लावावी. कारण सूर्य हा आपल्याला ऊर्जा देतो आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

मित्रानो आपल्या मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानाचे तोरण लावणे हे पण खूप शुभ मानले जाते.आंब्याच्या पानाचं तोरण जर लावेल तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.परंतु ती पाने वळली कि ती लगेच काढून टाकावीत.याच बरोबर अशोकाच्या पानाचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावणे पण खूप शुभ मानले जाते.