घरगुती उपाय

गाईच्या तुपात हे टाका, पोट साफ आणि मूळव्याध होईल नाहीसा.

मित्रानो तुमचं जर पोट साफ होत नसेल तसेच मूळव्याधीचा कोणाला त्रास होत असेल त्याच्यासाठी गाईचं तूप खूप फायदेशीर ठरेल .तुमचं जेवण जर पचत नसेल, पोट साफ होत नसेल ,काही जणांना मूळव्याध सुद्धा असतात तर लोकांनी तूप हे नियमित खायला पाहिजे. मित्रानो तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत हे खालीलप्रमाणे आहेत.

मित्रानो तुम्हाला जर मूळव्याध,पोट साफ होत नसेल आणि तुमचं जेवण तुम्हाला पचत नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात रोज एक चमचा तूप खाल्लं पाहिजे. तुपामुळे आपले पोट साफ होण्यास मदत मिळते तसेच तुपात अनेक गुणधर्म आहेत. तुमच्या पोटाच्या तक्रारीसाठी तूप हे खूप योग्य औषध असे मानतात.

तूप हे खूप आयुर्वेदिक आहे. तूपाला आयुर्वेदात खूप महत्व आहे. तूप हे तुमची पचनशक्ती सुधारायला मदत करते. तूप रोज एक चमचा खाल्याने तुमच्या पोटाच्या तक्रारी दुर होतात. तूप हे आहारात नक्की सेवन करा. आपण आज तुपात काय मिक्स करून घेतल्या पोटा बद्दलच्या तक्रारी दूर होणार आहेत ते पाहूयात.

मित्रानो आपण पहिला उपाय पाहुयात हा उपाय आपल्याला अर्ध जेवण झाल्यावर करायचा आहे .त्यासाठी आपल्याला गाईचे तूप आणि काळ मीठ घेयचं आहे.हे दोन्ही आपण जेवणाच्या मध्ये घेणार आहोत .एक चमचा तूप आणि चिमूटभर काळं मीठ /सैंधव मीठ मिक्स करून तुमचं अर्ध जेवण झाल्यावर हे तुम्ही घ्या आणि मग अर्ध जेवण करा म्हणजे तुमचं जेवण पचायला मदत होईल तसेच तुमचं पोट हे फुगणार नाही.

मित्रानो पहिला उपाय मित्रानो तुमचा हा उपाय झाल्यावर ,तुम्ही हे तुपाचं मिश्रण खाल्यावर नंतर तुमचं जेवण झाल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यायचे आहे. हे एक उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तुमच्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

मित्रानो आता आपण दुसरा उपाय बघुयात, त्यासाठी आपल्याला एक चमचा जिरे पाहिजेत आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. रात्री आपण एक ग्लास भरू पाणी आणि त्यात एक चमचा जिरे टाकून रात्र भर भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी अनोशा पोटी तुम्हाला हे हे जिऱ्याचा पाणी तुम्हा प्याच आहे असे केल्यास तुमच्या सगळ्या तक्रारी नाहीशा होण्यास मदत होईल.

जिरे हे पचनशक्ती सुधारते. जिऱ्याचा वापर केल्यामुळे तुमच्या मूळव्याध ,पोट फुगणे तसेच पोट साफ होण्यास मदत मिळेल. तर हे उपाय तुम्ही करून बघा तुम्हा त्याचा फायदा होण्यास मदत मिळेल.