लाईफस्टाईल

पावसाळ्यात ट्रीपला जाईचा प्लॅन करताय तर आजचा लेख खास तुमच्यासाठी, महाराष्ट्रातील पाच पावसाळी पर्यटन स्थळे

पावसाळा सुरु होतोय आणि अश्या पावसाळी वातावरणात फिरायला जाणे त्याची मज्जा काही औरच आहे. जरी हे सर्व असलं तरी पावसाच्या वेळी फिरायला जाणे म्हणजे गाड्या अडकतात तर ह्या सर्वांमध्ये नेमके कुठे जावं असा प्रश्न पडतो. आजच्या लेखात आपण ह्याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्रातील अशी भन्नाट पाच निसर्गरम्य ठिकाणे जिथे तुम्ही झटकन जाऊन येऊ शकता, ह्या ठिकाणांवर तुम्ही निसर्ग, हिरवळ पावसाचा पूर्ण फील घेऊन मजा करू शकता. आणि ह्या ठिकाणांच वैशिष्ट म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी जाताना रस्त्यालाच आणखी २ ते ३ आणखी स्थळे तुम्हाला पाहायला मिळतील, चला तर जाणून घेऊयात हि ठिकाणे कोणती आहेत.

बामणोली: साताऱयापासून फक्त ५० किमी वरती हे गाव आहे कोयनाने तयार झालेल्या शिवसागर तलावाच्या काठावर वसलेलं हे छोटेसे गाव आहे, अगदी शेणामातीचे घर अगदी जुन्या काळाची तुम्हाला हे गाव फील देईल, जुलै ते ऑक्टोबर मध्ये ह्या काळात तुम्ही भेट देऊ शकता. ह्या ठिकाणी स्थानिक लोकांनी बोटींग सुरु केले आहे हे येथील मुख्य आकर्षण आहे. तापोळा, वासोटा किल्ला नागेश्वर मंदिर अश्या ठिकाणी जाण्यासाठी बोटींग ची सुविधा आहे. इथली सर्वात बेस्ट डिश आहे ती म्हणजे गरम तेलात तळलेला आमळी मासा तोंडात टाका तुम्ही अगदी जन्मोजन्मी अशी टेस्ट विसरणार नाही.

तेथील तापोळा हे ठिकाण म्हणजे तर जणू मिनी काश्मीर सारखेच आहे हे त्याच्या दुर्मिळ नैसर्गिक सुंदरतेसाठी खूप प्रसिद्द आहे. हा परिसर अगदी हिरवळीने भरलेला आहे. इथे तुम्ही अगदी इथल्या लेक मध्ये बोटींग ट्रेकिंग, स्विमिंग, पॅराग्लायडिंग अश्या अनेक गोष्टी करू शकता, शनिवार रविवार सुट्टीसाठी हा एकदम मस्त बेत आहे.

ठोसेघर: पावसाळा म्हण्टले कि धबधबा आलाच, ठोसेघर धबधबा हा हंगामी धबधबा असल्याने तो ह्यावेळी भरभरून वाहतो. महाराष्ट्रातील ठोसेघर धबधबा हा सर्वात उंच धबधबा आहे, २० पासून अगदी ५०० मीटर उंचीवरील हे धबधबे आहेत. ट्रेकिंग, कॅम्पिंग इथे करता येते. हे सर्व करत असताना वज्रायी वॉटरफॉल ला जाईला विसरू नका, हे तीन टप्यात असून ८५३ फीट उंच आहे. ज्यांना इंद्रायणी भात आवडतो त्यांनी तेथील शेतकऱ्यांकडून इथला इंद्रायणी भात घ्याला विसरू नका. तिथून जवळच सज्जनगड देखील आहे.

शिवाय इथे जवळच वर्ल्ड हेरिटेज असणारे कास पठार उभेच आहे. सेप्टेंबर महिन्यात वेगवेगळ्या फुलांनी हे पठार आच्छादित असते. पठाराच्या खाली उतरला तर तुम्हाला तलाव आहे तिथे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर तलावात पाय टाकून बसू शकता तेथील निसर्गाचा आनंद घेऊ शकता. कासच्या पारदर्शी पाण्यात तुम्हाला अगदी तुमचे प्रतिबिंब दिसेल इतके पारदर्शी व स्वच्छ पाणी आहे इथे. जर प्लॅन जरा जास्त दिवसांचा असेल तर महाबळेश्वर देखील तुम्ही करू शकता.

पाचगणी: समुद्रसपाटीपासून सुमारे १३३४मीटर वरती वसलेलं हे शहर भरलेले आहे. शांत दऱ्या, उंच पर्वत, घनदाट जंगले, ऍडव्हेंचर ने भरलेलं हे ठिकाण आहे. पाच मोठ्या टेकड्यांच्या नावावरून ह्याला पाचगणी असे नाव पडले. सिडनी पॉईन्ट, टेबल लॅन्ड, पारशी पॉईन्ट, ढोम धरण इत्यादी इथली प्रमुख आकर्षणे आहेत. इथे तुम्ही ट्रेकिंग, हॉर्स राइडिंग, पॅराग्लायडिंग, रॉक क्लाइंबिंग अश्या अनेक गोष्टींचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. हे झाल्यावर तुम्ही आठवणीने टेबल लॅन्ड वरती जाऊन कणसावर लिंबू लावून ताव मारायला विसरू नका.

भंडारदरा: सह्याद्री पर्वत रांगांतील एक निसर्गरम्य व थंड हवेचे अप्रतिम ठिकाण आहे. नैर्सगिक खजिन्याचे खोर असे ह्याला म्हण्टले जाते. रतनगड हरिश्चंद्र किल्ला अशी प्रमुख ठिकाणे आहेत. भंडारदऱ्यातील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे कळसुबाई शिखर ज्याला महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर म्हणून देखील ओळखले जाते. इथे ट्रेकिंग व हायकिंग ची खूप ठिकाणे आहेत. इथे सहली साठी खूप चांगले ठिकाण आहे. तसेच इथे रेसोर्ट आहेत जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.

लोणावळा: लोणावळा म्हणजे पावसाळ्यातील फिरायचे हक्काचे स्थान आहे. लोणावळा हे समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर वसलेलं ठिकाण आहे. मुबंई पुणे एक्सप्रेस मार्गावर असल्याने दोन्ही शहरांना सोयीस्कर असे हे ठिकाण आहे. सह्याद्री आणि लेनाण्यांचे शहर असे ह्याला म्हटले जाते. ह्या ठिकाणी तुम्ही कुठेहि गाडी थांबवा तुम्हाला हिरवळ धबधबे, शांत दऱ्यातील आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. आहे आकर्षित असे लॉईन पॉइंट, टायगर पॉइंट, मंकी पॉइंट असे अनेक पॉइंट आकर्षित आहेत. लोणावळ्याच्या समोरच खंडाळा घाट आहे. विसापूर, राजमाची, लोहगड अशी ट्रेकिंग साठी ठिकाणे देखील आहेत. भुशी डॅम, कार्ला लेणी, बेडसा लेणी अशी ततुमहाला अनेक ठिकाणे इथे पाहायला आहेत.

ह्या पाच ठिकांणांसोबतच तुम्ही इथे माळशेज घाट, ताम्हणी घाट, लाव्हसा सिटी असे अनेक ठिकाणे आहेत. तर मित्रांनो ह्या सर्वांमधील तुम्ही कोणत्या ठिकाणी जायला आवडेल ते ठिकाण आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच आणखी काही ठिकाणे तुम्हाला माहिती असतील तर ती देखील तुम्ही आम्हाला कंमेंट मध्ये कळवा, आजचा लेख तुमच्या मित्रांना परिवारातील लोकांना नक्की शेयर करा.