रेपो रेट (Repo Rate ) , रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate ) आणि सीआरआर (C R R ) म्हणजे काय ?
आपण बातम्या मध्ये आणि वृत्तपत्रामध्ये वारंवार ऐकत किंवा वाचत असतो कि रिसर्व बँकेने आपले पतधोरणमध्ये वाढ किंवा घाट केली आहे. पण सामान्य लोकांना यांची कल्पना नसते कि पतधोरण चांगले झाल्यानंतर त्यांच्यावर कोणता परिणाम होत असतो. पतधोरणाची आढावा बैठक हि दार तीन महिन्यांनी होत असते हि बैठक रिसर्व बँक ऑफ इंडिया इथे होत असते. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट मध्ये बदल केल्या नंतर सामान्य व आर्थिक बदल होतो .
रेपो रेट (Repo Rate )
रिसर्व बँक इतर बँकांना मर्यादित कालावधी साठी जे व्याज आकारते त्याला रेपो रेट असे म्हणतात . रेपो रेट कमी केल्यानंतर बँका सामान्य लोकांना जे कर्ज देते त्या कर्जवरील व्याज कमी होण्यास सुरुवात होते. रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे बँकेतील व्यवहारातील पैसे कमी होतो. त्यामुळे बँक कर्जावरील व्याज वाढवते व त्याचा परिणाम सामान्य लोकांवर होतो.
रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate )
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रिसर्व बँक कमर्शियल बँकेकडून जे अतिरिक्त पैसा रिसर्व बँकेत ठेवले जाते त्यावरती बँकांना जे व्याज मिळते त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. रिव्हर्स रेपो रेट बाजारातील रोख नियंत्रित करण्याचे काम करते. कॅशचे प्रमाण वाढले की आरबीआय रिव्हर्स रेपो रेट वाढवते ज्यामुळे बँक त्यांच्याकडील कॅश रिझर्व्ह बँकेकडे जमा करेल.
सीआरआर (C R R )
सीआरआर म्हणजे (Cash Reserve Ratio) कॅश रिझर्व्ह रेशो सर्व बँकांना maintain करणे गरजेचे असते . सर्व बँकांना आपल्याकडील एक ठराविक रक्कम रिसर्व बँकेकडे ठेवावी लागते जेणे करून व्यवहारातील रोख रक्कम नियंत्रणात राहण्यास मदत होते .