RTE Admission 2024-25 Maharashtra. आरटीईच्या या फॉर्म भरण्याची मुदत आज पासून सुरु होणार आहे. त्या साठी लागणारे कागद पत्र कोणती तसेच या वर्षा पासून लागू होणारे नवीन नियम काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
अर्थ

आरटीईच्या २०२४-२०२५ प्रवेशाकरिता वयाची अट,कागदपत्रे आणि नवीन नियमावली पहा..

मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आरटीई (RTE Admission 2024-25 Maharashtra) चा २५% प्रवेश प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शालेय शिक्षण पद्धतीनुसार जानेवारीतच हि प्रवेशप्रक्रिया होत असते. परंतु या आरटीई च्या फॉर्म मध्ये काही नवीन नियम ऍड केल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला आहे. २०२४-२०२५ या वर्षासाठी सामाजिक,दुर्बल,मागासवर्गीय मुलांसाठी अंतर्गत २५% राखीव जागासाठी हि प्रक्रिया राबवण्यात येत असते.

आरटीईच्या (RTE Admission 2024-25 Maharashtra) अंतर्गत २५% जागांसाठी १६ एप्रिल या दिवशीपासून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.या वर्षी या प्रवेशप्रक्रियेला दोन महिने उशीर झाला आहे. परंतु आता या आरटीई च्या प्रवेशासाठी लवकरात लवकर अर्ज केला पाहिजे. या प्रवेशासाठी ची माहितीही घेतली पाहिजे. या मधला दिड महिना हा शाळांची नोंदणी करण्याकरिता लागलेला आहे.

मित्रानो आपल्या पुणे जिल्ह्यात आरटीई साठी ७८ हजार जागा आहेत आणि ५ हजार १५३ शाळा याची नोंदणी करण्यात अली आहे. या सगळ्या शाळांमध्ये ७७ हजार ९२८ जागा ह्या रिक्त आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे.

तसेच राज्यात ७५ हजार ९७४ शाळांनी आरटीई साठी नोंदणी हि केलेली आहे.तसेच या शाळांमध्ये २५ % रिक्त अश्या जागा भरण्यात येत असतात. या २५%रिक्त जागा ह्या ९ लाख ७२ हजार ८२३एवढ्या आहेत अशी हि माहिती प्राथमिक शिक्षक संचालक यांनी दिलेली आहे.

आरटीईच्या प्रवेशाकरिता नवीन नियमावली

विद्यार्थाना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतर असणाऱ्या अनुदानित शाळेत किंवा सरकारी शाळेत त्यांना प्राधान्य मिळणार आहे.जर एक किलोमीटर मध्ये जर सरकारी शाळा नसेल तर तीन किलोमीटर पर्यंत असणारी शाळेस प्राधान्य मिळेल.

भाडेतत्वावर राहणाऱ्या ना रेन्ट ऍग्रिमेंट हे ११ महिन्या पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे.तुम्ही भाडेतत्वार राहत नसाल आणि तुम्ही रेंट अग्रीमेंट दिले आणि तिथे जर राहत नसाल तर तुमच्या मुलाचा प्रवेश नाकारण्यात येईल.

तुमचे उत्पन्न हे १लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. मुलाच्या प्रवाशांसाठी मागील एक वर्षाचा (२०२३-२०२४) उत्पन्न दाखल द्यावा लागतो.

मुलाचे वय हे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ६ वर्ष पूर्ण झालेले असायला हवे.त्यासाठी तुम्हाला वयाचा दाखला देखील असला पाहिजे.

प्रवेशासाठी भरलेला अर्जावर खोटी माहिती आढळल्यास तुमचा अर्ज रद्द करण्यात येऊ शकतो.