महादेवाला बेलपत्र वाहण्याचे नियम
धार्मिक

भगवान महादेवाला बेलपत्र वाहण्याचे आणि बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहेत.

या वर्षतिल सर्वात पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्या प्रत्येक भक्त हा भगवान महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी उपासना आणि पूजा करत असतो. कित्येक जण हे शिवलिंगाव विविध वस्तू अपूर्ण करत असत जसेकी जल, बेलपत्र, अक्षदा, धोत्रा, रुईची फुले, दूध इत्यादी गोष्टी अर्पण करून महादेवाला प्रसन्न करून घेण्याचे पर्यंत करतात.

पण भगवान महादेवाला वरील पैकी सर्वात प्रिय वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र. यालाच आपण संस्कृत मध्ये बिल्व पत्र असे सुद्धा म्हणतोत. महादेवाला बेलपत्र अर्पण करण्या मागे काही कथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक अशी आहे. समुद्र मंथन करते वेळी त्यातून विष बाहेर आले ते भगवान महादेवांनी पिले त्यामुळे त्यांच्या मस्तकाची प्रचंड आग होत होती. त्यावेळी सर्वदेवी देवतांनी त्यांच्या मस्तकावरती बेलपत्र ठेवली आणि सोबत जलधारा अर्पण केली म्हणजेच पाणी.

यामुळेच भगवान महादेवाचे मस्तिक शीतल आणि थंड झाले. तन्वी तेव्हा पासूनच बेलाची पाने त्यांना अपूर्ण करण्याची परंपरा सूर झाली आहे. बेलाची पाने आणि पाणी तेव्हा पासून त्यांना अपूर्ण केले जात आहे. प्रत्येक भक्त श्रावण महिनात शिवलींगावर बेलाची पाने अर्पण करत असतो ते याच कारणामुळे. भगवान महादेवाच्या भक्तांनी श्रावण महिन्यात दर सोमवारी बेलपत्र अर्पण करावे जर का हे शक्य नसेल तर कमी कमी एकदा तरी अर्पण अवश्य करावे.

बऱ्याच भक्तांना बेलपत्र वाहताना काही नियम पाळणे गरजेचे असते. बेलपत्राला खुप मोठे महत्व आहे. त्यामुळेच त्याचे नियम अवश्य पाळावे. पहिला नियम चतुर्थी, अष्टमी, सोमवार, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या काही दिवशी बेलपत्र चुकून हि तोडूनये. त्याच सोबत बेलपत्र तोडताना बेलाच्या झाडाला कोणताही त्रास होणार आंही याची काळजी घेतली पाहिजे. कारण बेलपत्र तोडताना बरेच भक्त चक्क फांदीच तोडतात. असे करू नका. बेलाचे पान तोडताना ओम नमःशिवाय हा जप अवश्य करावे.

काही भक्तांना बेलपत्र कशी अपूर्ण करायची हे सुद्धा माहिती नसते. मित्रांनॊ बेलपत्राचा मऊ भाग हा शिवलींवर ठेवायचा आहे आणि खबडीत भाग हा आपल्या दिशेने आला पाहिजे. सोबत बेलपत्र हे कमी कमी तीन पाने असलेले असले पाहिजे. काही वेळेस पाच पाने असलेले बेलपत्र सुद्धा चालते. पण तीन पेक्षा कमी पाने असलेले कधीही अपूर्ण करुनये.

काही ठिकाणी बेलपत्र उपलब्ध होऊ शकत नाही. अशा वेळी शक्य असेल तर चांदीची बेलपत्र अपूर्ण केली तरी चालेले. विशेष म्हणजे चांदीची बेलपत्रे हि पुन्हा पुन्हा वापरता येतात ती स्वच्छ धुवून त्याचा वापर करावा. मित्रांनो श्रवण महिना हा पवित्र असल्यामुळे संपूर्ण महिन्यात देवाचे नामस्मरण करत रहावे. यामुळे अनेक प्रकारे मनशांती मिळूशकते. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ..

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.