मित्रांनो सध्या पितृ पंधरवडा चालु आहे. पितृ पंधरवडा म्हणजे या पितृ पंधवड्यात आपण आपल्या पितरांना म्हणजेच आपले मृत झालेले व्यक्ती त्यांना आपण जेवण बनवतो कारण ते या पंधरवड्यात खाली जेवायला येतात असे म्हणले जाते.तसेच आपण आपल्या पितरांना जेवायला घालून त्यांना शांत करून आणि त्याचे आशिर्वाद घेत असतो असे म्हणले जाते. या पंधरवड्याचा शेवटचा दिवस असतो यालाच आपण सर्वपित्री आमावस्या असे म्हणतात. या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करण्यासाठी चांगली मानली जाते.तसेच जन आपल्या पूर्वजांची श्राद्ध तिथी माहिती नसते असे लोक सर्वपित्री अमावसेला श्राद्ध करू शकतात असे म्हणतात. तसेच भाद्रपद अमावसेलाच सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात.
मित्रांनो २५ सप्टेंबर २०२२ , रविवारी सर्वपित्री अमावस्या आली आहे. सर्वपित्री अमावसेला पितरांचे श्राद्ध करण्यासाठी महत्वाची मानली जाते.या अमावसेला आपल्या पितरांचे आशिर्वाद घेण्यासाठी महत्वाचा दिवस असतो असे म्हणतात . या अमावसे आपण आपल्या पितरांना आशीर्वाद हवा असेल तर हि तीन कामे केल्यास आपल्याला शांती आणि समृद्धी मिळते असे म्हणतात. तर कोणती कामे आहे ते आपण पाहुयात. सर्वपित्री अमावसेला कोणती कामे करावी ती आहेत सांन,ध्यान आणि दान हि आहेत.
मित्रांनो सर्वपित्री अमावसेला करायचे पाहिलं काम म्हणजे तुम्ही सकाळी आंघोळ हि एका नदीवर जाऊन करावी नदीवर जायला जमत नसेल तर तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ किंवा गंगाजल थोडं टाकून मग अंघोळ करावी म्हणजे गंगेत आंघोळ केल्यासारखे असते असे म्हणतात.तसेचतुम्ही आंघोळ करताना “हर हर गंगे ” असे म्हणत आंघोळ करावि असे म्हणतात.
मित्रानो सर्वपित्री अमावसेला आपल्या पितरांचे आशीर्वाद हवे असल्यास आपण दान धर्म केला पाहिजे. आपण जर गोर गरिबांना दान केल्यास आपले पितर आपल्यावर खूष होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्यासाठी सर्वपित्री अमावसेला आपण दान केलं पाहिजे. तुम्ही अन्नदान हे केले पाहिजे. किंवा तुम्ही पांढरे कपडे दान केले पाहिजे तसेच तुम्ही तांदूळ पण दान केले तरी चालतील . तसेच तांब्या आणि पिठाचे पण दान करू शकतो. तसेच या अमावसेच्या दिवशी गाईला आणि कुत्र्याला खायला घातले पाहिजे असे म्हणतात. गाईला तुम्ही भाकरी आणि थोडा गूळ खायला घातल्यास खूप पुण्य लागत असे म्हणतात. या भोगला ‘अक्षय भोग” असे म्हणतात.तसेच गाईच्या शेपटीवर थोडे पाणी शिंपडा आणि तेच पाणी स्वतःच्या अंगावर शिंपडा असे केल्यास आपला पितृदोष दूर होतो असे म्हणतात. तसेच कावळ्याला पण खायला घालावे असे म्हणतात.
मित्रानो पितृ अमावसेला करायचे तिसरे काम आहे ते म्हणजे ” ध्यान ” होय. या पितृ अमावसेला आपण ध्यान केले पाहिजे. “ओम श्री पितृ देवाय नमः “हा जप करावा. हा जप करताना आपण नदीजवळ बसून करावा , पिपळाच्या झाडाखाली बसून जप करावा किंवा गोशाळेत जाऊन हा जप करावा . जर तुम्हाला या कोणत्याही ठिकाणी जाऊन जप करावा असं कारण जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरात दक्षिण दिशेकडे तोंड करून जप करावा असे केल्यास पितरांना मोक्ष मिळतो तसेच आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि हा जप करताना तुळशीची माळ असेल तर माळ घेऊन जप करा जर माळ नसेल तर पाच किंवा दहा मिनिटे , तुम्हला जमेल तेवढा वेळ जप करावा असे म्हणतात.
तुम्ही हा जप जर पिंपळाच्या झाडाखाली बसून करणार असलात तर एक पंधरा दोरा घेऊन जाऊन त्या पिंपळाला हा दोरा सात केला प्रदक्षणा घालत तो दोरा पिंपळाच्या झाडाला गुंडाळावा . असे केल्यास आपले पितर आपल्यावर आनंदी होतील. तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून आपल्या पितरांना खुश करावे म्हणजे आपले पितृदोष दूर होतील असे म्हणतात.
सर्वपित्री आमावसेच्या दिवशी आपल्या पितरांची आठवण करून त्यांना प्रार्थना केली पाहिजे तसेच त्यांना खुश केले पाहिजे म्हणजे ते आपल्यावर खुश होऊन आपले पितृदोष दूर होतील आणि या सर्वपितृ अमावसेच्या दिवशी कोणाला वाईट बोलू नये तसेच आपल्या दारात आलेल्या आतिथीचा आदर करावा म्हणजे आपले पितर आनंदी होतील . या दिवशी नॉन व्हेज खाऊ नये.
टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.