हरितालिकेच्या दिवशी चुकून ही सात कामे करू नका.
धार्मिक

हरितालिकेच्या दिवशी चुकून ही सात कामे करू नका. पाप भयंकर लागेल.

३० ऑगस्ट च्या दिवशी आली आहे हरितालिका. या दिवशी कित्येक महिला या दिवशी पूजा करतात. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील तृतीय पक्षात येणाऱ्या तिथीस हरतालिका असे म्हणतात. या दिशी प्रत्येक महिला पूजा करतात व्रत ठेवतात. आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे, आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी हे वृत करतात. तसेच ज्या मुलींचे लग्न होणार आहे. अशा मुली आपल्याला चांगला नवरा मिळावा यासाठी सुद्धा वृत ठेवतात.

आज आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत. हरितालिकेच्या दिवशी अशी काही कामे आहेत ती चुकून सुद्धा करणे योग्य नाही. जर का हि कामे आपण केल्यास आपण जे वृत केले आहे ते खंडित होते. जे काही वृत किंवा पूजा केली आहे त्याचे लाभ आपल्याला मिळत नाही. तसेच पूजेचे पुण्य जे आपल्याला मिळणार होते ते सुद्धा न मिळता पाप आपल्याला मिळते.

हरितालिकेचे वृत हे करताना सकाळी लवकर उठून सुरु करावे. तसेच प्रत्येक महिलांनी आपले केस धुवूनच वृताचा संकल्प करावा. हरितालिकचे व्रत हे सर्वात अवघड वृत आहे. तसेच हे वृत सकाळी सूर्य उद्यापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्य उद्यापर्यंत चालते. तसेच सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यावर सौभाग्याचा सर्व अलंकार परिधान करावे. या वृताला सुरुवात करताना कळ्या कपड्यांचा वापर करू नका.

यादिवशी वृत सुरू केल्यानंतर घरातील कोणत्याही व्यक्तीने केस कापूनये. तसेच नखे सुद्धा काढूनये. हे वृत दोन प्रकारे केले जाते, एक निर्जला आणि निराहार. निर्जला म्हणजे संपूर्ण दिवस पाणी सुद्धा न पिता हे वृत केले जाते. आणि निराहार म्हणजे कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन न करणे. ज्या का तुमचे शरीर तुम्हला साथ देत नसेल तर तुम्ही फराळाचे काही तरी खाऊन उपास केला तरी चालतो.

हे पण वाचा :- गणपतीची मूर्ती घरी आणताना या नियमांचे पालन अवश्य करा.

काही धर्मशास्त्रात असे सुद्धा संगतीला गेले आहे. ज्या महिला या वृताचे पूर्ण पालन करत नाही. त्याना सतत आर्थिक समस्या जाणवत राहते. तसेच ज्या महिला वृत करतात पण जेवण करतात त्यांना दुसऱ्या कुळात जन्म मिळतो. तसेच या पूजे साठी आणि वृता साठी जे काही साहित्य लागणार आहे. ते स्वच्छ आणि पूर्ण असले पाहिजे. तसेच घरात वादविवाद होणार नाही याची काळजी नक्की घ्या.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.