शिवलीला पाटील यांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी
मनोरंजन

शिवलीला पाटील यांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी. बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक आहे.

बिगबॉस मध्ये गेलेल्या शिवलीला पाटील या चंगल्याच ट्रॉल झाल्या आहेत. बरेच वारकरी संप्रदायातील लोक नाराज झाले आहेत. अजारी असल्याचे कारण सांगून त्या बिगबॉस शो मधून बाहेर पडल्या आहेत. इतर मीडिया सोबत बोलताना त्या म्हणाल्या ” मी बिगबॉस मध्ये जाऊन खुप मोठी चूक केली आहे. पण या ठिकाणी जाऊन कमी कोणतेही वाईट गोष्टी केल्या नाही. पुन्हा अशी चूक होणारी नाही याची काळजी मी घेईन ”

शहरी भागतील लोकांना कीर्तन काय आहे हे माहित नाही. जे लोक जास्त प्रमाणात सिनेमे पहातात किंवा त्यात काम करतात त्यांना कीर्तन काय आहे हे माहित नाही. बिगबॉस मध्ये काही लोकांचं कीर्तन हि परंपरा माहीत होती. मी त्या ठिकाणी गेले तो निर्णय पूर्ण पणे माझाच होता. मला कोणीही त्या ठिकाणी जायला संगितले नाही. त्या ठिकाणी जाण्याचा माझा हेतू पूर्ण पाने वेगळा होता.

शिवलीला पाटील म्हणाल्या मला खुप दिवसा पासून बिगबॉस च्या ऑफर येत होत्या. मी जे काम कीर्तनाच्या व्यासपिटावरून जे करी होते तेच काम मी बिगबॉस मधून केले. बरेच लोक आणि संप्रदायातिला लोक सुद्धा माझ्यावर नाराज झाले आहेत. माझी चूक झली असली तरी, मी वाटचुकली नाही माझे ध्येय आणि हेतू एकदम सरळ होता.

बिगबॉस शो पाहणारे लोक कदाचित कीर्तन पाहत नसतील कबहुना त्याना कीर्तन हि परंपरा माहीत नसेल. माझा हेतू या सर्वाना कीर्तना बदल माहीत किंवा गोडी निर्माण करण्याचा माझा हेतू होता. कीर्तनाची परंपरा सर्वां पर्यंत जावी या हेतूने मी तिथे गेली होती. माझ्यावर बरेच वारकरी संप्रदायातील लोक नाराज झाले आहेत. मी त्यांची दोन्ही हात जोडून माफी मागते. आणि तुम्ही सर्व जण माझ्य पेक्षा मोठे आहात त्यामुळे मला माफ करतात. ज्या समाजाने आणि संप्रदायाने मला खुप मोठे केले आहे ते सुद्धा माझी चूक मान्य करून मला माफ करतील.

पण माझ्या विचारून पहिले तर जे अमराठी लोक आहेत आणि त्याना कीर्तन परंपरा माहित नाही. अशा लोकांना कदाचित कीर्तना बदल काहीतरी माहिती मिळाली असेल. मी जगाच्या पाठीवर कोठेही गेले तरी माझ्या मुखात विठुरायाचे नाव असेल आणि विचार छत्रपतींचे असतील असे शिवलीला पाटील म्हणाल्या. समाजातील लोक माझी चूक माफ करतील असे म्हणत त्यानी आपली बाजू मांडली.