घरात निगेटिव्हिटी असल्याचे संकेत जाणून घ्या
वास्तुशास्त्रा

घरात निगेटिव्हिटी असल्याचे संकेत जाणून घ्या…

मित्रांनो बऱ्याचवेळा आपल्याला सगळं अगदी छान चालू असताना आपल्याला घरात निगेटिव्हिटी जाणवते.घरात सतत काहींना काही वाद होत राहतात आणि याचाच परिणाम आपल्या घरातील कामावर ,आर्थिक व्यवहारावर होत असतो. तसेच याचा परिणाम हा आपल्या नात्यावर जास्त दिसतो.

आपण घरातील शांततेसाठी कितीही पूजा केल्या तरी याचा परिणाम दिसून येत नाही.यावरूनच असं दिसून येत कि आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी दिसून येते.या निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम आपल्या घरावर खूप होतो.

मित्रानो तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे का हे कसे ओळखायचे,याचे संकेत कोणते आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. याचप्रमाणे घरातील निगेटिव्ह एनर्जी कशी कमी होईल याबद्दल पण माहिती सांगणार आहे.

१)घरात सतत आर्थिक तोटे आणि नुकसान होते आणि कोणते काम हाती घेतले तरी त्या कामात यश मिळत नाही.

२)घरात सतत काही ना काही इलेक्ट्रिक वस्तू खराब होत असतात ,म्हणजेच फ्रिज ,टीव्ही ,वॉशिंग मशीन ,मिक्सर अश्या वस्तू खराब होत राहतात.

३)घरात सतत आजारपण चालू राहते आणि किती हि आपण औषधं घेतली तरी ते आजार संपतच नाही. तसेच घरात कोण ना कोण सतत आजारी पडत राहत.

४)घरातील व्यक्ती हि सतत काही ना काही विचार आणि चिंता करत असते आणि जास्त चिंता केल्याने डिप्रेशन मध्ये सुद्धा ती जाऊ शकते.

५)घरात सतत एखाद्या व्यक्तीला वाईट स्वप्ने पडू लागतात.

६)घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस आणि थकवा जाणवत राहतो आणि घरातील निगेटिव्ह एनर्जी मुले ती व्यक्ती सतत गाळून गेल्यासारखी दिसते.

घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी करण्यासाठीचे उपाय :-

१)घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवावा.

२)घरातीळ फारशी पुसताना त्या पाण्यात नेहमी चमचाभर खडे मीठ टाकून त्या पाण्यानी घर पुसून घ्यावे.

३)घरात नेहमी सुगंधी उदबत्ती चा वास असू द्यावा,म्हणजेच घरात सुगंधी वास असावा यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यास मदत होते.

४)घरात दररोज संद्याकाळी तुळशीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा.

५)घरात दररोज हनुमान चाळीसा वाचावी किंवा ऐकावी .

६)महिन्याचा अमावस्या आणि पौर्णिमेला घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करावा आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावावा.

७)घरात दररोज संद्याकाळी कापूर जाळावा.