घरगुती उपाय

रात्री भिजत ठेवून सकाळी एकदा घ्या पोटाचे अपचन, गॅस, ढेकर येणे सर्व बंद होईल.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण पाहणार आहोत एक रामबाण घरगुती उपाय. जर जेवणानंतर आपल्याला पोट फुगलेलं वाटतंय तुम्हाला जर गॅसेस किंवा अपचन, वारंवार ढेकर येणे ह्यामुळे जर तुम्ही ग्रस्त असाल तर आजचा उपाय फार फायदेशीर ठरणार आहे. खूप लोकांना ढेकर येते, गॅसेस चा त्रास होतो किंवा गॅस झाल्याने किंवा अपचनामुळे आपल्याला डोकेदुखी ह्यासारखे त्रास होतात. कमी वेळात, कमी खर्चात होणार हा आजचा घरगुती उपाय.
मित्रांनो ह्यामुळे पोटात थंडावा निर्माण होईल, व जे काही पोटाचे विकार असतील ते सर्व विकार पूर्णपणे गायब होतील.

मित्रांनो घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून हा घरगुती उपाय आपण करणार आहे चला तर जाणून घेऊयात आजचा उपाय कसा आहे ते. मित्रांनो हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारी पहिली गोष्ट आहे ते म्हणजे धने. हा सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. आपल्याला फक्त एक चमचे धने घ्याचे आहे. हा उपाय फक्त आपण सलग तीन दिवस केला तरी आपला त्रास हा गायब होणार आहे. संपूर्ण त्रास तुमचा थांबणार आहे. दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे जिरे. जिरे आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे एक वेळा उपाय करण्यासाठी आजचे आपले प्रमाण आहे. सहज उपलब्ध होणार हा देखील पदार्थ आहे. पचन व्यवस्थित करण्यासाठी जिऱ्याचा खूप फायदा आपल्याला होतो.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बडीशेप, जेवण झाल्यानंतर आपण अनेक जम बडीशेप खातो ती पचनासाठी, डोळे, हाडांच्या आरोग्यसाठी बडीशोप फार फायदेशीर ठरत असते म्हणून आज आपण घरगुती उपायांमध्ये बडीशेप वापरणार आहोत. पोटात थंडावा निर्माण करण्यासाठी बडीशेप उपयुक्त ठरते. पोटातील जळजळ होते ती देखील ह्यामुळे थांबते अशी हि बडीशेप आपण अर्धा चमचा घ्याची आहे.

तर सगळे पदार्थ म्हणजेच अर्धा चमचे जिरे, अर्धा चमचा बडीशेप, व एक चमचा धने असे सर्व एकत्रित करायचे आहे. त्यानंतर आपण आणखी एक पदार्थ आपण ह्यात घेणार आहोत ते म्हणजे इलायची हि देखील थंड प्रकृतीची आहे. अशी इलायची जर आपण २ ते ३ घ्याची आहे. नंतर आपण पुदिना देखील घ्याचा आहे जर असेल तर नसेल तर तुम्ही बाकीच्या वस्तू देखील पुरेश्या आहेत.

तर असे सर्व आपण रात्रभर पाण्यात भिजू द्याचे आहे एक ग्लास पाणी घेऊन त्यात आपण हे सर्व भिजू द्याचे आहे. हे ठेवताना झाकून ठेवावे, सकाळी आपण हे मिश्रण चांगले ढवळून नंतर आपण ते मिश्रण गाळून घ्याचे आहे. गाळून घेतलेलं पाणी आपण त्यात अर्धा चमचा रस लिंबाचा व थोडे चवीपुरते काळे मीठ असे सर्व टाकून ते पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊन ते प्याचे आहे.

हे पाणी पिल्याने आपले सर्व पोटाचे आजार, अपचन गॅसेस, ढेकर येणे ह्या सारख्या सर्व समस्यांपासून आपले सरंक्षण होणार आहे. तर हा उपाय आपण करून पंपहा हा उपाय सकाळी उपाशीपोटी प्याचे आहे. आणि हो जे उरलेले जे धने जिरे आहे ते फेकून ना देता आणखी एकदा आपण दुसऱ्यादिवशी पाण्यात ते तुम्ही वापरू शकता. आणि रात्री हे पाणी तुम्ही पिऊ शकता. तर आजचा उपाय आवडला असेल तर लाइक व तो तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा.