उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या
आरोग्य घरगुती उपाय

उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या…

मित्रानो चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उन्हाळा खूप वाढला आहे. वातावरणात देखील अधिक उष्णता जाणवू लागली आहे.मार्च ते मे महिन्यात भरपूर ऊन असत.परंतु चैत्र महिन्यापासून उष्णता वाढायला सुरुवात होते.

उन्हाळा वाढला कि अधिक घाम येणे,घामोळ्या येणे,खूप तहान लागणे,अंगावर लाल चट्टे येणे,डोकेदुखी,उन्हामुळे त्वचा टॅन होणे,डिहायड्रेशन होणे यासारख्या समसेला सामोरे जावे लागते.तर मित्रांनो आपण बघुयात कि उन्हाळ्यात आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची याची सविस्तर माहिती घेऊयात.

अधिक घाम येणे :-

वातावरणातील वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातीलदेखील तापमान वाढते आणि त्यामुळे आपल्याला घाम हा खूप येतो.आपल्या शरीरातून घाम अधिक येत असल्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे असते. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी सारखे थोडे-थोडे पाणी पिणे किंवा सरबत,फळाचे ज्युस ,नारळ पाणी पिणे गरजेचे असते.त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. तसेच कॉटन किंवा मऊ आणि सैलसर कपडे घालणे गरजेचे असते.

घामोळ्या येणे:-

उन्हाळ्यामुळे शरीराला अधिक घाम येतो आणि त्यामुळे शरीराला घामोळ्या आणि रॅशेस येतात.तसेच बारीक पुरळ येतात ,शरीराला खाज येते या सगळ्यालाच घामोळे म्हणतात. घामोळ्याचा त्रास हा लहान मुलांना अधिक होतो.ज्यांना अधिक घाम येतो त्यांनी दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी.तसेच त्वचा कोरडी राहण्यासाठी पावडर लावावी . घामोळ्याला सतत पावडर लावून त्वचा हि कोरडी ठेवावी म्हणजे घामोळ्या लवकर कमी होतात.

डोकेदुखी :-

उन्हाळ्यात उष्णता वाढल्यामुळे बाहेर जाताना छत्री किंवा डोक्याला स्कार्फ वापरावा .तसेच डोळ्याला गॉगल वापरावा अशी जर तुम्ही उन्हाळ्यात काळजी घेतली तर उन्हामुळे तुमचं डोकं दुखणार नाही,अशी तुम्ही तुमची काळजी घ्या.तसेच बाहेर गेल्यावर अधिक प्रमाणात लिकविड आपल्या शरीरात गेले पाहिजे नाहीतर शरीर डिहायड्रेड होते आणि मग शरीरात पाणी कमी झाल्यामुळे डोकेदुखी होते.

उन्हाळ्यात काय खाल्ले पाहिजे आणि काय खाऊ नये-

उन्हाळ्यात सरबत,ताक ,माठातील पाणी ,फळाचे ज्युस ,सोलकढी,नारळ पाणी असे दिवसभरात थोडे थोडे करून घेणे गरजेचे असते.तसेच कलिगड ,मोसंबी,द्राक्षे ,केळी अश्याप्रकारची सगळी फळे हि खाल्ली पाहिजेत.तसेच काकडी ,बीट ,गाजर देखील खाल्लं पाहिजे.

उन्हाळ्यात काय खाऊ नये-

उन्हाळ्यात तिखट खाणं सहसा टाळावेच. तसेच नॉनव्हेज,तेलकट पदार्थ ,आंबवलेले पदार्थ,बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. खूप जास्त ऊन असेल तर आईस्क्रीम देखील खाऊ नये. उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. फ्रीज मधील पाणी सहसा टाळावेच त्यापेक्षा माठातले थंड पाणी प्यावे. उन्हातून आलं कि लगेच आंघोळ करू नये.