आरोग्य

जवस खाण्याचे आश्चर्य चकीत करणारे फायदे

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो एक काळ असा होता कि जवसाची पूड तसेच जवसाची चटणी आपण आवर्जून खायचो. अतिशय चिविष्ठ अशी लागणारी अशी हि जवसाची चटणी आज मात्र आपल्या आहाराचा भाग राहिलेली नाही. आज आपण जवसाकडे कानाडोळा केलेला आहे. आपण जवसाची पूड केली जायची आणि ती भाजी करताना त्यात टाकली जायची थोडक्यात काय तर आपल्या आहाराचा अविभाज्य घटक होती हे जवस.

आज परस्थिती अशी झालेली आहे कि आपण जवस वापरत नाही, मित्रांनो जवस खाण्याचे अनेक फायदे असतात. आज आपण हेच जाणून घेणार आहोत. जवस आपण जर आहारात समावेश केला, जवसाची चटणी किंवा त्याची पूड कर आपण भाजीत वापरली तर त्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सर्वात मोठा पहिला फायदा आहे तो म्हणजे हृदयासाठी, जर आपण सकाळी उठल्यावर जर आपण अमवश्या पोटी जर अर्धा ते एक चमचाभर जवस हे जर चावून चावून खाल्ले तर आपले हृदय हे स्वस्थ राहते, निरोगी राहते. आपल्याला ब्लड प्रेशर चा त्रास आपल्याला होणार नाही. तसेच आपल्याला शुगर देखील होणार नाही. ज्यांना शुगर आहे त्यांनी हा उपाय नक्की करा ह्यामध्ये खूप फरक पडतो. मधुमेह ह्या रोगामध्ये हे फार फायदेशीर आहे, हृदयाला एकंदरीत चांगले ठेवण्याचे काम हे जवस करत असते.

मित्रांनो दुसरा मोठा फायदा आहे तो म्हणजे आपली पचनसंस्था नीट ठेवण्यासाठी. मित्रांनो आपले जर पचन चांगले असेल तर आपले जवळ जवळ ९० टक्के आजार आहेत ते पळून जातात, मात्र जर आपले पचन चांगले नसेल तर आपल्या आहारात जवसाचा समावेश केला तर आपले पचन सुधारते. आपले पित्त देखील कमी होते. आपल्या आहारात आपण जवसाहा वापर सुरु करा. ज्यांना भूक कमी लागते, त्यांनीसुद्धा जर जवस खाणे सुरु केले तर त्यामुळे तुमची भूक वाढेल तसेच तुमही जे खाल ते योग्य रित्या पचेल सुद्धा.

तिसरा मोठा फायदा म्हणजे जर तुम्हाला कुठे भाजले असेल तर तुम्हाला बाजारात जवसाचे तेल मिळते, हे जवसाचे तेल व चुन्याची निवळी हि एकत्र करून ती आपण भाजलेल्या ठिकाणी आपण लावायची किंवा बांधावी, ह्यामुळे जखमा लवकर भरून येतात. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, मित्रांनो ह्या पाठदुखीवर देखील जवस खूप फायदेशीर आहे. तुमच्या त्या पाठदुखीच्या जागेवर बांधून ठेवा हे जवस आपल्या दुखणाऱ्या जागेवरच्या नसा मोकळ्या करते आणि तुमचे दुखणे थांबवते.

मित्रांनो जर तुम्हाला दात हिरड्या निरोगी करायच्या असतील तर तुम्ही जवसाचे तेल वापरू शकता, तुम्ही ह्या तेलानी जर हिरड्याची मसाज केली तर किंवा जवस तुम्ही जर भाजून घेतले आणि ते जर चावून चावून खाल्ले तर आपल्या ज्या नसा आहेत हिरड्या आहेत ते निरोगी व मजबूत होतात. मित्रांनो बऱ्याच जणांना कफ होतो ते अश्या वेळी आपण जवसाचे पीठ गरम करून आपण आपल्या छातीवर शेकायचे आहे आपला छातीतला कफ आहे तो लगेच वितळतो व बाहेर पडतो.

तसेच ताप आले असेल तर हा ताप देखील ह्यामुळे कमी होतो तसेच कोणत्या प्रकारचे वायरल इन्फेकशन असेल तर ते देखील ह्यामुळे होत नाही. ह्यामध्ये जवस खाणे फायद्याचे ठरते. मित्रांनो अश्या प्रकारचे जवस खाण्याचे अनेक फायदे आहेत, म्हणून आपण देखील जवस खात जा आणि शरीर निरोगी ठेवा.