धार्मिक

श्री स्वामी समर्थ यांच्या असंख्य लीला आहेत. स्वामी सत्ता पाठीमागे उभे असतात. त्यामुळे निराश, आणि दुःखी होऊ नका.

स्वामी ज्या व्यक्तीच्या मागे उभे असतात त्या व्यक्तीला कधी निराश आणि दुखी होण्याची गरज नसते. श्री स्वामी समर्थ आपल्या विविध रूपाने आपल्याला मदत करत असतात. जे भक्त स्वामींची उपासना आणि आराधना करतात त्याना कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता कमी पडत नाही. अशी एक गोष्टी आपण पहाणार आहोत त्यात स्वामींची लीला आपल्याला किती मोठी आहे हे समजेल.

एक दिवस स्वामी सर्व भक्तांना दर्शन देत असताना खुप क्रोधीत झाले होते. अशा वेळी त्याचा क्रोध कमी करण्यासाठी त्या गावातील एक स्वामी भक्त महिला ती आल्या शिवाय त्याचा क्रोध कमी होत नाही हे सर्वां माहित होते. असा एक भक्त त्या महिलेस बोलवण्यासाठी जातो. ती स्वामी भक्त स्त्री कोण होती हे जाणून घेऊ. अक्कलकोट नगरात एक स्त्री राहत होती ती थोडी वेडसर होती. परंतु तिच्या वेडसर वागणे असले तरी स्वामींची कृपा तिच्यावर होती.

ती स्त्री वेडसर असल्यामुळे तिच्या जवळ फक्त एक कापडायचे गाठूडे आणि एक मडके असे. आणि ती पूर्ण गावात फिरत असते. ती वेडसर असल्यामुळे तिच्या कडे कोणी जास्त लक्ष देत नसे. पण तिचा कडे स्वामींची कृपा होती. आणि भल्या भल्या लोकांना स्वामींची लीला आणि स्वामींचे वाक्य याचा अर्थ समजत नसे पण हि जी स्त्री होती तिला स्वामी जे काही बोलत असतात त्याचा अर्थ तिला लगेच समजून येत असे. काही वेळेस स्वामी महाराज कोड्यात बोलत असत पण ती स्त्री त्या वाक्यच अर्थ व्यवस्तीत समजून सांगत असत.

स्वामी महाराज क्रोधीत झाल्यावर त्यांचा सेवेकरी त्या वेडसर स्त्रीला बोलवून आणायला जात असे. दोघेही वापस येत असताना भजन करत येत असे ते आल्यावर त्यांचे भजन एकल्यावर स्वामी महाराज हसत असे. अशाच एके दिवशी स्वामी महाराज सर्व भक्तांना दर्शन देत होते . आणि त्या ठिकाणी काही भक्त हे दुसऱ्या शहरातून आले होते. त्याही स्वामी महाराजाना विचारले तुम्ही कोण आहात. त्यावर स्वामी म्हणाले. मूळ पुरुष, वडाचे झाड , दत्तनगर , या वाक्यच अर्थ कोणाला सुद्धा लागत नव्हता. पण त्या स्त्रीने सविस्तर अर्थ या वाक्याचा संगितला.

या वाक्याचा अर्थ संगत असताना सर्वाना ती म्हणाली वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तत्रे रूपाने अवतरले आहे. हे वाक्य ऐकल्यावर सर्वां आश्चर्य वाटले स्वामींच्या या अवघड वणीची उकल एका वेड्या स्त्रीने केली. ज्या लोकांना मोठे ग्रंथ पाठ असतात. मोठे अभंग माहित असतात पण स्वामींच्या वाणीतून आलेले वाक्यचा अर्थ लवकर समजत नसे. पण त्या वेड्या स्त्रीला स्वामींची कृपा लाभली होती. यामुळे स्वामींचा विणीतून येणारे अवघड वाक्यचा अर्थ लगेच समजत असे.

याचा अर्थ असत होतो कि आपण जो पर्यंत भक्ती मध्ये मना पासून एक रूप होत नाही तो पर्यंत आपल्याला स्वामींची लीला समजणार नाही. स्वामी महाराजनची वाणी समजणार नाही. आपण स्वामी भक्त्त वेडे झालो तर स्वामीची लीला समजेल आणि आपल्याला कधीही निराश किंवा दुखी होण्याची गरज नाही. स्वामी कोणत्याही रूपाने आपल्या मागे उभे राहतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ..