आरोग्य

मायग्रेन डोकेदुखीची लक्षणे,कारणे आणि घरगुती उपाय…

मायग्रेन हा एक डोकेदुखीचा प्रकार आहे. या मध्ये आपले अर्धे डोकं दुखत यालाच “मायग्रेन” असे म्हणले जाते.मायग्रेनचा त्रास हा महिलांना अधिक होतो.मायग्रेनमध्ये अर्धे डोकं हे जास्त दुखत असत,डोळ्यासमोर अंधारी येते ,मळमळ आणि उलट्या अश्या प्रकारे अनेक त्रास होत असतो.

सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणाव ,चुकीच्या आहार पद्धती,अनुवंशिकता,औषधाचे साईड इफेक्ट आणि उच्च रक्तदाब यामुळे अनेकांना मायग्रेन चा त्रास होत आहे. मायग्रेनची करणे ,लक्षणे आणि घरगुती उपाय आपण खालीलप्रमाणे पाहुयात.

मायग्रेनची कारणे:-

१)चहा ,कॉफी ,फास्टफूड ,तेलकट पदार्थ ,मसालेदार पदार्थ आणि पित्त वाढवणारे पदार्थ अश्या प्रकारचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे मायग्रेन चा त्रास होतो.
२)असंतुलित हार्मोन्समुळे महिलांना मायग्रेनचा त्रास हा अधिक प्रमाणात होतो.
३)झोप व्यवस्थित न झाल्यामुळे आणि जागरणामुळे.
४)मोठ्या प्रमाणात आवाज कानावर पडल्यामुळे.
५)अनेक प्रकारच्या व्यसनामुळे
६)टिव्ही ,मोबाइल फोन चा अधिक वापर आणि जास्त डोळ्यांना ताण दिल्यामुळे.
७)डोळ्यावर एकदम प्रकाश पडल्यामुळे.
८)औषदांच्या साईड इफेक्ट मुळे .
९)डिहाइड्रेशन.
१०)अधिक प्रमाणात प्रवास करणे.

मायग्रेनची लक्षणे :-

मित्रांनो मायग्रेनचा त्रास सुरु होण्यापूर्वी काही लक्षणे दिसायला सुरुवात होते. तसेच काही डोकेदुखी सुरु होण्यापूर्वी हि लक्षणे दिसू लागतात. एकदम डोळ्यासमोर अंधारी येते,हातापायाला मुंग्या येतात,उजेड सहन होत नाही,काहीजणांना बोलायला त्रास होतो हि लक्षणे सुरुवातीला दिसू लागतात आणि त्यानंतर मायग्रेनची खालीलप्रमाणे लक्षणे दिसून येतात.

१)अर्ध डोकं दुखत,डोक्याच्या एकाच बाजूला असहाय्य वेदना होतात.
२)उलट्या आणि मळमळ होते.
३)अशक्तपणा जाणवतो.
४)जेवण जात नाही आणि काहीच खाण्याची इच्छा होत नाही.
५)कशातच लक्ष्य लागत नाही.
६)डोळ्यासमोर अंधुक दिसू लागतं आणि बेचैन होत.
७)तीव्र प्रकाश आणि मोठा आवाज सहन होत नाही.

मायग्रेनवरील उपचार;-

मित्रानो मायग्रेनमध्ये आपले डोकं खूप दुखत असत त्यामुळे डॉक्टर आपल्याला होणारा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला औषध देतात. तसेच मायग्रेनमुळे आ[प्ल्याला होणारी मळमळ,उलट्या आणि होणारे अनेक त्रास कमी करण्यासाठीदेखील औषध देतात. परंतु मायग्रेनवाल्या पेशन्ट नि डॉक्टर ला विचारल्याशिवाय पेनकिलर घेऊ नये.

मायग्रेनच्या त्रासासाठी त्याचे योग्य ते उपचार घेतले पाहिजेत. मायग्रेनसाथीच्या योग्य त्या तपासण्या केल्या पाहिजेत. मायग्रेनच्या डोकेदुखीसाठी MRI आणि CT स्कॅन करावे लागू शकते.

मायग्रेनवरील घरगुती उपचार :-

१)आलं :-आलं हे मायग्रेनच्या त्रासासाठी अगदी योग्य असे औषध आहे. मायग्रेनमध्ये अर्धे डोकं दुखत असल्यावर आल्याचा तुकडा चावून झाला तर त्यावर आराम मिळतो आणि मळमळ देखील कमी होण्यास मदत होते.

२)लवंग :-लवंग हि देखील मायग्रेन वर अतिशय चांगला घरगुती उपाय आहे.लवंग एक रुमालात ठेऊन गरम करून त्याचा वास घेतला तर त्याचा फायदा होतो किंवा लवंग बारीक करून त्याचा लेप कपाळावर लावला तर डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

३)जास्त उजेडापासून दूर रहावे:-मोबाईल,लॅपटॉप आणि टीव्ही यापासून दूर राहणे योग्य आहे . तसेच उजेडाकडे एकदां पाहू नये , ज्यास्त त्रास होत असेल तर शांत डोळे बंद करून झोपून राहावे.

४)थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे:-मायग्रेनचा त्रास होत असेल म्हणजेच डोकं हे जास्त प्रमाणात दुखत असेल तर डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तर डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

५)देशी गाईचे तूप वापरावे:-मायग्रेनचा त्रास म्हणजेच डोकेदुखी हि जास्त प्रमाणात होत असेल तर देशी गाईचे तूप हे दोन दोन थेंब दोन्ही नाकपुडीत सोडले पाहिजे यामुळे देखील खूप फायदा होतो किंवा याच देशी गाईच्या तुपात कपूर मिक्स करून त्याचा लेप कपाळावर लावला तर डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.