जेष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी उपासना साधना व्रत बरेच लोक करताना दिसून येतात. यादिवशी माता लक्ष्मीला करून घेण्यासठी विविध उपासना आणि आराधना केली जाते. त्याच सोबत विविध मंत्र जप केले जातात. आपल्या घरातील गरिबी कमी होण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी एक छोटासा उपाय आपल्या करायचा आहे.
गरातील गरिबी लवकर कमी होत नाही. घरात सतत आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. घरातील लोकांना नोकरी मध्ये सतत काहींना काही अडचणी येत आहेत. त्याच सोबत व्यवसायात अडचणी येत आहेत. अशा वेळी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यास त्याचे लाभ खुप चांगले मिळू शकतात. त्याच सोबत ज्या लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे अशा लोकांनी सुद्धा हा उपाय केल्यास त्यांना त्यातून लवकरात लवकर मुक्ती मिळण्यासाठी विविध मार्ग मिळण्यास मदत होऊ शकते.
वटपौर्णिमाच्या दिवशी दिवस भरात कधीही हा उपाय करू शतकात. उपाय सुरु करण्याआधी स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्याच सोबत. हा उपाय आपल्या घरातील देवघरात करायचा असल्यामुळे आपल्या देवघरातील भगवान श्री हरी विष्णू किंवा माता लक्ष्मीची विधीवत पूजा करायची आहे. पूजा मध्ये जर माता लक्ष्मीची प्रतिमा असेल तर लाल रंगाचे फुल नक्की अर्पण करावे. जर का तुम्ही भगवान श्री हरी विष्णू यांची प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी तुळस नक्की अर्पण करावी.
पूजा संपन्न झाल्यावर घरात खीर करावी आणि प्रसाद म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीला खाण्यास देण्यात यावी यामुळे घरातील लोकांच्या एका मेकाबद्दल असेल राग कमी होण्यास मदत होते. या दिवशी हळदीला अनन्यसाधारण महत्व संगितले गेले आहे. यामुळे नैवेद्य तयार करताना त्यात चिमूट भर का असेना हळद टाकावी.
नैवेद्य दाखून झाल्यावर आपल्या छोटासा उपाय या ठिकणी करायचा आहे. एका वाटीत तीन ते चार चमचे हळद घ्याची आहे. त्यात पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायची आहे. आणि भगवान श्री हरी विष्णू किंवा माता लक्ष्मी यांच्या चरणी हि हळद लावायची आहे. आणि त्या नंतर भगवान श्री हरी विष्णू याना प्रसन्न करून घेण्यासाठी मंत्र जप करायचा आहे तो सुद्धा एकशे आठ वेळा. भगवान श्री हरी विष्णूंचा जप आहे “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” किंवा माता लक्ष्मीचा “ॐ श्री श्रीये नमः” या दोन पैकी कोणत्याही एका मंत्राचा जप आपण करू शकतात.
त्यानतंर जी हळद आपण देवीदेवतांच्या चरणी लावली होती ती हळद एक छोट्याशा ताब्यात घ्याची आहे. आणि संपूर्ण घरात थोडी थोडी करून शिंपडायचे आहे. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती कमी होण्यास मदत होते. त्याच सोबत या हळदीने आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचे आहे. आणि दोन्ही बाजूस स्वस्तिकच्या समांतर रेषा काढायचे आहे. यामुळे घरात कधीच नकारात्मक ऊर्जा येणार नाही.
ज्या घरात नकारात्मकता ऊर्जा नसते त्या घरात सर्वांची प्रगती होत असते. त्याच सोबत या उपाय बद्दल कोणाला हि सांगायचे नाही. तसेच मनात कोणतीही शंका न आणता हा उपाय करायचा आहे. कोणतीही उपासना करताना संपूर्ण श्रद्धेने केल्यास त्याचे लाभ चांगले मिळतात.
टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.