आरोग्य

हृदयाची घ्या काळजी ,हिवाळ्यात वाढत आहे हार्टअटॅकचे प्रमाण…

मित्रांनो हिवाळ्यात वातावरण खूप थंड असते त्यामुळे आपल्या शरीराचे देखील तापमान हे कमी होत असते त्यामुळे आपल्याला थंडीत आपल्या हृदयाची जास्त काळजी घ्यावी लागते.तसेच आता हार्ट अटॅक चे प्रमाण जास्त वाढले आहे. तसेच लहान वयात सुद्धा हार्ट अटॅक चे प्रमाण वाढले आहे.

हिवाळ्यात थंडी असल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाहिन्या गोठल्या जातात आणि रक्तदाब वाढून आपल्या हृदयावर खूप ताण येतो. त्यामुळे हार्ट अटॅक चा धोका वाढतो. ज्यांना हृदयातील रक्तवाहिन्यांचा काही त्रास असेल त्यांना जास्त धोका असतो. त्याचप्रमाणे वय झालेले व्यक्ती ,मधुमेहाचे पेशंट ,जास्त ताणतणाव ,अनुवंशिकता अश्या लोकांना जास्त प्रमाण वाढते.

मित्रांनो डॉक्टर सांगतात कि आपल्या शरीराला आपण उबदार ठेवले पाहिजे,असं केल्याने आपल्या हृदयातील रक्तवाहिन्या ह्या आकुंचन पावणार नाहीत आणि आपल्याला हार्ट अटॅक चा धोका कमी होईल.

हिवाळ्यातील जास्त थंडीमुळे आपल्या हृदयाची गती ही खूप वाढते.त्याचप्रमाणे आपण थंडी मध्ये जर जास्त झोपून राहिलो तर आपल्या शरीरात रक्त पुरवठा हा व्यवसित होत नाही.मित्रानो हिवाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यावी याची माहिती खालीलप्रमाणे सांगणार आहे.

हिवाळ्यात हृदयाची काळजी अशी घ्या:-

१)ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे अश्या लोकांनी थंडीच्या दिवसात पहाटे फिरायला जाऊ नये,कारण पहाटे थंडी हि खूप जास्त असते.

२)थंडीच्या दिवसात शरीर हे उबदार राहण्यासाठी गरम कपडे घालावेत म्हणजेच तुमचे शरीर हे उबदार राहील,तसेच फुल्ल कपडे घालावेत आणि पाय आणि हात देखील उबदार ठेवावेत.

३)थंडीच्या दिवसात व्यायाम हा करू नये,त्यापेक्षा हृदयाची काळजी घ्यावी.

४)थंडीमध्ये तळलेले पदार्थ हे कमी खावेत.

५)कमीत कमी ७ ते ८ तासाची झोप हि नक्की घ्यावी.

६)मद्यपान करू नये,यामुळे धडधड वाढते,चक्कर येणे,छातीत दुखणे अश्या समस्या येऊ शकतात.

७)हृदयाची नियमित तपासणी करून घ्यावी.