तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेन ची भूमिका राखी विजन साकारणार
मनोरंजन

ही अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारणार तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये. पाह सुंदर फोटो.

तारक मेहता का उल्टा चष्मा हि सोनी टीव्ही वरील सर्वात लोकप्रिय मालिका पैकी एक आहे. या मालिकेत बरेच पात्र असे आहेत कि प्रेक्षकांना रोजभेटीस येतात. किंबहुना असे सुद्धा म्हणायला हरकत नाही कि प्रेक्षकांना रोज तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पात्र पहिल्या शिवाय रहावत नाही. बऱ्याच काळा पासून हि मालिका सुरू असूनसुद्धा तिची लोकप्रियता कमी झाली नाही.

या मालिकेतील बऱ्याच दिवसा पासून एका पात्राची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे दयाबेनची, हे पात्र बऱ्याच दिवसापासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. असे बोले जाते. पण त्या बद्दलच्या बऱ्याच बातम्या समोर येत असत. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणी हि पुन्हा परत हीच भूमिका साकारणार आहे असे बोलले जात होते.

अभिनेत्री दिशा वाकाणी हि पुन्हा दयाबेन च्या भूमिकेत येणार आहे अश्या बातम्या येत होत्या त्यावेळीस प्रेक्षक तिची वाट पहात होते. तसेच दयाबेन या पात्राची सुद्धा बऱ्याच दिवसा पासून लोक वाट पहात आहेत. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या काही दिवसात दयाबेन हे पत्र लोकांच्या समोर येणार आहे. ते सुद्धा नवीन अभिनेत्रींच्या स्वरूपात.

दिशा वाकाणी या भूमिकेत दिसणार नसली तरी हे पत्र साकरण्यासाठी “हम पांच ” मधील अभिनतेरी स्वीटी अर्थात अभिनेत्री राखी व्हिजन या भमिकेसाठी सज्ज झाली आहे. एका वेगळ्या अभिनेत्रीला दयाबेनच्या भूमिकेत पाहणे प्रेक्षकांना कदाचित थोडे अवघड होऊ शकते. बऱ्याच वर्षपासून हि भूमिका लोकंच्या मनावर रज करत होती . दिशा वाकाणी हिला द्याबानो याच नावाने ओळखले जात होते.

मीडिया रिपोर्ट नुसार राखी व्हिजन दयाबेनच्या व्यक्तिरेखा संदर्भात चर्चा करत आहे. जवळ पास काही दिवसात ठोस निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. काही सूत्रांच्या माहिती नुसार राखी व्हिजनला पात्रात तिच्या काही गोष्टींचा टच त्यात ठेवायचा आहे. जेणेकरून त्याव्यक्तिरेखांमध्ये काही प्रमाणात ताजेपणा दिसून येईल.

बऱ्याच बैठक सध्या सुरु असून काही नवीन गोष्टी समोर येत आहेत. दयाबेनसारखे चेहऱ्याचे हाव भाव देणे राखीला देणे जमेल असे नाही किंबहुना तिला सूट होईल असे नाही. तसे पहिले गेल्यास राखीला आज सुद्धा तिच्या हम पांच मधील स्वीटी या पात्राने ओळखले जाते. यामुळेच का असेना ती थोडा वेळ घेत असेल. ज्या पद्धतीने स्विटीची व्यक्तिरेखा साकारली होती, त्याच पद्धतीची अपेक्षा प्रेक्षकांची असू शकते.

राखीला दयाबेन सारख्या प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारणे खुप कठीण होऊ शकते. तसेच व्यक्तीरेखा आधीपासूनच लोकांच्या नजरेत राहिलेली आहे. दयाबेन हि व्यक्तिरेखा लोकांच्या पसंतीस उतरेल यासाठी तिला खुप कष्ट करावे लागणार आहेत. येणाऱ्या काळात याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकते.