The benefits of healthy aloe vera..
आरोग्य

आरोग्यदायी कोरफडीचे फायदे..

कोरफड हि आयुर्वेदीक असते आणि कोरफडीचा रस खुप आयुर्वेदिक असते. कोरफडीमध्ये कॅल्शिअम ,मॅग्नेशियम , झिंक, लोह हे भरपूर प्रमाणात असतात . त्यामुळे रोजच्या आहारात कोरफडीच्या आहारात आपण कोरफडीचा समावेश केला पाहिजे. कोरफड हि आपल्या शरीरासाठी जास्त उपयुक्त असते.कोरफडीचे आयुर्वेदिक फायदे आपण बघणार आहोत.

कोरफडीचे फायदे:-

कोरफडीचा रस रोज सेवन केल्यास आपले वजन कमी होण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामुळे मधुमेह सुद्धा कमी होण्यास मदत होते. कोरफडीच्या ताज्या रसामुळे पचनशक्ती सुधारते , असिडिटी कमी करते , मूळव्याध कमी करते या सगळ्या आजारावर उपयोगी ठरते. कोरफडीचा रस हा आपले शरीर डिटॉक्स करते. रोज जर कोरफडीचा रस सेवन केल्यास पचनशक्ती सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. कोरफडीच्या रसाचे रोज सेवन केल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. कोरफड हि चेहऱ्याला रोज लावल्यास चेहरा टवटवीत,फोड ,चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात असे कोरफडीचे अनेक उपयोग आहेत.

कोरफडीच्या रसाच नियमित सेवन केल्यास सर्दी आणि खोकल्यावर पण उपयोग होतो. कोरफडीच्या रसाचे नियमित सेवन केल्यास पचनशक्ती सुधारते. कोरफडीचा रस नियमित सेवन केल्यास आपल्या दाताच्या आरोग्यसाठी कोरफड चांगली असते आणि हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.आपल्याला तोंड आले असल्यास कोरफडीचा गर लावल्यास तोंड कमी होत. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच योनीचे इन्फेकशन कमी होण्यास मदत होते.

कोरफडीचा रस बनवायची पद्धत :-

कोरफडीची जी हिरवी पात असते ती घेऊन त्याची हिरवी साल काढून घायची आणि आतला पांढरा गर काढून तो गर मिक्सरमध्ये बारीक करून मग त्याचा रस तयार होतो. तो मिक्सरमधील बारीक केलेला रस पिण्याच्या आधी गाळून घ्यायचा , तो कोरफडीचा रस खूप कडू असतो . तो रस त्यायच्या वेळी त्यात मध मिसळून घायचा म्हणजे तो कडू नाही लागत.तुम्हाला जर कोरफडीचा रस बनवणं अवघड वाटत असेल तर आजकाल मेडिकलमध्ये सुद्धा उपलबध आहे. तो कोरफडीचा रस ऑरग्यानिक आहे का ते चेक करून घ्यावा.

कोरफडीचा रस सेवन करण्याची पद्धती:-

कोरफडीचा रस रोज ३ ते ४ चमचे पिल्यास त्याचा फायदा होतो. कोरफडीच्या रसाची चव हि कडू असते , त्यामुळे त्यात  मध घालून घेतला तरी चालेल किंवा फ्रुट जुस मध्ये मिक्स करून घेतला तरी चालतो. कोरफडीचा रस हा आरोग्यासाठी चांगला असतो पण तो डॉक्टराना विचारून घ्याव.