लाईफस्टाईल

मालकाच्या अंतिम संस्कारामध्ये वासरूआलं दोरी तोडून, मालकाच प्रेत बघून झाला तो बेचैन…

आपण जेवढं प्रेम आपल्या पक्षी आणि प्राण्यावर करतो , तसेच ते पण आपल्यावर तसच प्रेम करतात. त्यांचा आपल्यावर जास्त जीव असतो. याचंच एक उदाहरण म्हणजे झारखंड मधील रांचीमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. एका गाईचं वासरू दोरी तोडून आपल्या मालकाच्या अंतिम संस्कारामध्ये पोहोचलं आणि आपल्या मालकाचं प्रेत बघून त्याला खूप वाईट वाटलं आणि तो आपल्या मालकालच्या अंतिम संस्काराचे सगळे विधी होसी तोपर्यंत तिथेच थांबला होता.

झारखंड मध्ये रांची मध्ये एका माणूस मरण पावला होता, ते सगळे त्या माणसाला स्मशानात घेऊन जात होते तेव्हा त्या माणसाच्या वासराला कळले कि त्याच्या मालकाचा मृत्यू झाला आहे . तेव्हा तो त्याला बांधलेले दावं तोडून त्याच्या मालकाच्या अंतिम यात्रेत सामील झाला, सगळे लोक त्याला घाबरून त्याला पळवुन लावत होते पण तो गेला नाही ते वासरू त्या माणसाच्या प्रेता जवळ थांबला . तेव्हा एका माणसांनी सांगितलं कि हे त्या मेलेल्या माणसाचं वासरू आहे. मग त्या माणसांनी त्या मेलेल्या माणसाचा चेहरा त्या वासराला दाखवला तेव्हा ते वासरू जोरात ओरडू लागले , नंतर ते वासरू त्या सगळ्यांसोबत तो स्मशानात गेल आणि सगळे अंतिम विधी होई पर्यंत ते वासरू स्मशानातच थांबून राहील होत.

हि माहिती रांची मधल्या हजारीबाग जिल्यातील चौपारण मधील एक मलिक आणि त्याच पाळीव वासरू यांच प्रेम आपल्याला बघायला मिळालं. हे सगळं बघून लोक खूप भावुक झाले होते. चैथी मधील मेवालाल ठाकूर चा मृत्यू झाला होता., आणि त्यांच्या अंतिम यात्रे मध्ये लोक जमले होते . तेव्हा त्याच्या अंतिम यात्रे मध्ये त्यांचं वासरू दोरी तोडून त्याच्या मालकाच्या अंतिम यात्रेत सामील झाला.

मालकाच्या अंत्य संस्कारांच्या वेळी स्म्शानात घेउन गेल्यावर त्या मेलेल्या माणसाला अंतिम कार्याची तयारी चालू असताना वासरू सुध्दा त्यांना मदत करत होते. वासरू आपल्या तोंडात लाकडं सुद्धा धरू त्यांना मदत करत होते आणि मुखाग्नि च्या वेळी सुद्धा ते वासरू त्यांच्या सोबतच उभा होता आणि पाच फेरे पण घेतले. अंत्य संस्कार पूर्ण होस तोपर्यंत ते वासरू तिथेच उभे होते. ते वासरू खूप रडत होत आणि त्याच्या डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते. हि सगळी घटना सगळ्या लोकांनी कॅमेऱ्यात कैद करू घेतली होती. कारण मेवालाल ला मुलगा असं कोण नव्हतं आणि मेवालाल नि त्या वासराला आपल्या मुलाला प्रमाणे पालन केलं होत.

त्या वासराचा त्याच्या मालकाबद्दलच प्रेम बघून सगळ्यांनाच खूप आश्यर्य वाटलं होत, कि एवढं प्रेम एखादं जनावर आपल्या मालकावर करत असेल , कारण आजच्या या जगात कोण कोणाचं नसत आणि नाही तरी हे मुक जनावर आपल्या मालकावरच एवढं प्रेम बघून सगळ्यांनाच खूप चांगलं वाटलं , कि या जगात अजून माणुसकी शिल्लक आहे. हे खूप छान शिकण्यासारखं उदाहरण आहे.