सर्वां आता वेध लागले आहे ते म्हणजे गौरी आवाहनाचे. सर्वांच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. भद्रपात महिण्यातील षष्टी तिथीसगौरी आपल्या घरी येतात. तीन दिवस चालणाऱ्या सर्वात मोठ्या सणाची सुरवात होते. तीन दिवस विविध नैवेद्य दखवले जाते. त्यामध्ये सुद्धा काही ठराविक पदार्थ आवर्जून त्यामध्ये असायला हवे. त्याच सोबत तीन दिवसात तीन विविध कार्य सुद्धा केले जाते. याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
गौरी पूजन हे तीन दिवस चालते. पहिल्या दिवशी गौरी घरी येतात. दुसऱ्या दिवशी पूजा आरती आणि नैवेद्य दखवला जातो. आणि तिसऱ्या दिवशी पूजा आरती आणि नैवेद्य दुखवून विसर्जन केले जाते. काही ठराविक भागानंतर गौरीचे आगमन आणि पूजा हि त्या त्या संस्कृती आणि परंपरे नुसार केले जाते. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात, तर काही ठिकाणी बसलेल्या असतात तर काही ठिकाणी राशीवरच्या असतात.
गौरीचे वेगवेगळ्या पद्धतीने पूजन.
वेगळ्या ठिकाणी गौरीचे पूजन वेगवेगळ्या ठिकाणी पद्धतीने केले जाते. प्रत्येक जण आपल्या संस्कृति आणि परंपरे नुसार गौरीचे पूजन केले जाते. गौरी ज्या ठिकाणी बसवल्या जातात त्या ठिकापर्यंत लक्ष्मीच्या पावले रंगोळीने काढल्या जातात. तसेच जी महिला गौरी लक्ष्मी घरात घेऊन येते तिचे पाय पाण्याने आणि दुधाने धुतले जाते आणि हळद कुंकू लावतात.
घरी घरात आणताना लक्ष्मीच्या पावलांवरून चालत यावे. तसेच गौरी आणताना जो कोणी सोबत आहे त्यांनी घंटी किंवा तामण किंवा ताट वाजवत आणावे. शांततेत गौरी घरी अणूनये. नेहमी गौरी घरात आणताना वाजत गाजत आणावे. यामुळे घरात सुद्धा आनंद आणि चैतन्य निर्माण होत असते. गौरीची स्थापना करताना सर्वाना उदंड आयुष्य मिळो तसेच घरात सुख समृद्धी आणि आनंदाने घर भरून रहावे यासाठी प्रार्थना करावी.
तीन नैवेद्याचा मान जेष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी असतो.
गौरी साठी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी कोणते कोणते नैवेद्य दाखवावे याबद्दल माहिती जाणून घेऊ. पहिल्यदवशी मूग आणि तांदूळ यांची खिचडी, खीर वाळवटाची, बेसनाचा लाडू, पापड, तर काही ठकाणी मेथीची भाजी आणि भाकरी, अंबाड्याची भाजी आणि भाकरी, तसेच प्रकारचे फराळाचे पदार्थ सुद्धा केले जाते.
दुसऱ्या दवशी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवले जाते. तसेच सोळा प्रकारच्या भाज्या एकत्र करून एकच भाजी केली जाते. तर काही ठकाणी सोळा वेगळया भाज्या केल्या जातात. तसेच विविध प्रकारच्या पाच कोशिंबीर केल्या जातात. तसेच आमटी चे सुद्धा विविध प्रकार असतात. त्याच सोबत गोड पदार्थ केले जातात. जसेकी श्रीखंड , खीर , पुरण , लाडू यासारखे पदार्थ केले जातात. त्याच सोबत दुसऱ्या दिवशी काही ठकाणी केळीच्या पानावर हे सर्व पदार्थ वाढले जातात. आणि मगच नैवेद्य दखवले जातात.
तिसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि आरती करून विसर्जन करून केले जाते. यादिवशी गाठी घेतल्या जातात. या दिवशी सकाळी आरती करून गौरीला नैवेद्य दखवले जाते. यादवीशी फक्त कानवले, खीर , भात ,दही यांचा नैवेद्य दाखवला जातो.
टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.