The inspirational story of the "Delivery Girl".
लाईफस्टाईल

“डिलिव्हरी गर्ल ” ची प्रेरणादायी कहाणी..

दुपारी १. ३० वाजता दरवाजाची बेल वाजली . दरवाजा उघडला तर दरवाज्यात एक बाई काळा चष्मा आणि ओढणी गुंडाळली होती आणि तिच्या हातात एक पार्सल होत ती हात पुढे करून म्हणाली , “पार्सल “. थोड्या वेळ मला कळलं नाही कि ती कोण होती. कारण नेहमी डिलिव्हरी करणारे तर नेहमी मुलंच असतात. आपल्या सगळ्यांच्या तोंडातच बसले आहे ना,” डिलिव्हरी बॉय “हे नाव त्यामुळे बहुतेक मला आश्चर्य झालं,कि कधी “डिलिव्हरी गर्ल” असेल असं कधी मनात आलं नाही.

कारण माझ्या समोर होती ती डिलिव्हरी गर्ल होती,पारुल परमार . पारुल चे पती नोकरी करत होते.तिला दोन मूळ होते. एक मुलगा नववी ला होता आणि दुसरा चौथीला होता. पारुल सध्या स्कुटी पण शिकत होती ती सकाळी क्लास ला पण जात होती. तिला दिड वर्ष पूर्वी पेपर मध्ये डेलिव्हरी गर्ल च्या नोकरीची जाहिरात दिसली होती., तेव्हा तिने लगेच अप्लाय केला. मी तिला विचारलं तुम्हाला वेगळं नाही का वाटलं. कारण हे तर पुरुषांचं प्रोफेशन झालं आहे.

त्यावर पारुल म्हणाली कि, असं काही नाही हा जॉब चांगला आहे. वेळेची काही अट नाही. आपल्याला पार्सल चा अलॉट होतो आणि आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण प्रत्येकाचं पार्सल डिलिव्हरी करायचं . मी सकाळी ८ ते ११ ड्रायविंग शिकून मग डिलिव्हरी साठी निघते आणि दुपारी २ वाजता घरी जाऊन बाकीची कामे पूर्ण करते आणि मुलांसोबत वेळ घालवते. असे मी तोडा वेळ काम करून दार महिना १० ते १५ हजार रुपये कमावते . माझा नवरा चांगला कमवतो पण या महागाई किती झाली आहे, त्यामुळे तोडा माझा हि हाथभर लागतो. आम्ही दोघे मिळून कमावल्यामुळे संसाराची गाडी व्यवस्तीत चालते. तशी दुपारी बायका आणि मुलंच घरी असतात त्यामुळे डिलिव्हरी करायला मला सेफ वाटते.

पारूलची हिंमत बघून मला खूप चांगलं वाटलं आणि मी तिचा एक फोटो काढला. कारण तुम्हाला पण तिचा अभिमान वाटावा. आणि आपल्या देशात तिचा गर्व असावा, कि ज्या देशात एक वेळ अशी होती कि , मुलींना शिक्षण सुद्धा घेता येत नव्हतं आणि आता त्याच मुली आता कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत., सगळ्याच क्षेत्रात पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी नाहीत.