धार्मिक

२३ मार्च श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन,हे नक्की करून बघा,इच्छा पूर्ण होतील,संकटे दूर होतील…

मित्रांनो ,श्री स्वामी समर्थ ! ह्या वर्षीचा स्वामींचा प्रकट दिन हा २३ मार्च ला आला आहे,तसेच या दिवशी गुरुवार आला आहे. गुरुवार हा स्वामींचा विशेष वार मानला जातो.तसेच स्वामींचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी खूप महत्वाचा असतो. या दिवसाची स्वामी भक्त खूप आतुरतेने वाट बघत असतात.

मित्रानो या वर्षीच्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही काही विशेष सेवा करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल , तसेच तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होण्यास मदत मिळेल आणि तुमचे सगळे दुःख दूर होण्यास मदत मिळेल आणि तुमच्या सगळ्या अडचणी देखील दूर होण्यास मदत मिळेल.

मित्रानो स्वामींच्या प्रकट दिनादिवशी काही विशेष सेवा करा ,त्या कोणत्या सेवा आहेत ते मी तुम्हाला खालील प्रमाणे सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

मित्रानो तुम्ही मी सांगितलेल्या सेवा ह्या तुमच्या घरात किंवा तुमच्या घराजवळच्या स्वामींच्या मठात किंवा दत्त मंदिरात सुद्धा करू शकतात.स्वामींची पहिली सेवा म्हणजे स्वामींचा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता . हा ग्रंथ खूप सोप्या शब्दांत असल्यामुळे तुम्ही तो सहज वाचू शकता. या ग्रंथात २१ अध्याय आहेत. हे तुम्ही एका दिवसात पण वाचू शकता, एकाच दिवशी हा ग्रंथ वाचला तरी चालतो, हा ग्रंथ वाचायला १.३० तास लागु शकतो. किंवा तुम्ही हि पोथी रोज तीन अध्याय असं वाचाल तर सात दिवसात हि पोथी पूर्ण वाचून होते.तर मित्रानो तुम्हाला जसा वेळ असेल तस तुम्ही हि पोथी वाचू शकता.

मित्रानो स्वामीसाठीची दुसरी सेवा आहे , ती म्हणजे स्वामी समर्थ स्तोत्र महात्म, हि पोथी मिलिंद माधव यांनी अत्यंत सोप्या शब्दांत लिहिली आहे.हे स्वामी समर्थनच स्तोत्र खूप कमी वेळात वाचून होत. अनेक स्वामी भक्त हि पोथी अगदी रोज वाचतात.हि पोथी अत्यंत सोप्या आणि गोड शब्दात हि पोथी आहे. ह्या स्वामींच्या स्तोत्र खूप फलदायी आहे.

मित्रानो स्वामींची तिसरी सेवा म्हणजे स्वामींचा जप आहे. तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या जप हा करू शकता,या दिवशी स्वामींचा जप हा ११ जप माळ हा जप करायचा आहे. हा जप हा तुम्ही तुमच्या घरात किंवा स्वामींच्या मठात देखील करू शकता.हा जप तुम्ही नॉन व्हेज खाल्ल असल्यास फक्त करू नका.स्वामींचा जप करताना मनोभावे जप करा म्हणजे तुम्हाला त्याच फळ हे नक्की मिळेल.

मित्रानो स्वामींची चॊथी सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही रोज करू शकता. स्वामीच नामस्मरण हे तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा थोडासा वेळ मिळाला तरी तुम्ही स्वामीच नामस्मरण हे करू शकता. स्वामींच्या नामस्मरनासाठी खास असं काही ठिकाण नाही तुम्हला हवं तिथे तुम्ही स्वामीच नामस्मरण करू शकता.

मित्रानो स्वामींची पाचवी सेवा म्हणजे तुम्ही स्वामींची नामावली वाचावी.स्वामींच्या या नामावलीत स्वामी बद्दल विशेष माहिती हि सांगितली आहे. हि नामावली फक्त १० ते १५ मिनिटातच वाचून होते. त्यामुळे तुम्ही हि स्वामींची नामावली हि वाचावी .

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.धन्यवाद.श्री स्वामी समर्थ !