हृदयासाठी घातक असे बॅड कोलेस्ट्रॉल न वाढवणारे तूप बनवा अश्या पद्धतीने
घरगुती उपाय

तूप बनवण्याची पद्धत ज्यामुळे हृदयातील हानिकारक फॅट्स तयार होत नाही.

तूप हे भारतीय लोकांच्या खाद्य पदार्था पैकी एक आहे. प्रत्येक भारतीय व्यक्ती शक्यतो तूप भात तसेच वरण भात त्यावर थोडे तरी तूप टाकून खातो. ज्या दिवशी आपल्या घरात पुरण पोळी तयार होते त्या दिवशी तुपाचे महत्व जास्त असते. तूप खाण्याचे अनेक चांगले फायदे आहे . त्याचे अति सेवन जास्त झल्यास त्याचे तोटे सुद्धा तितकेच आहेत.

तुपामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक आहार असतात. पण बऱ्याच लोकांची अशी मान्यता आहे जर का तूप अति सेवन केले तर आपल्या शरीरातील चरबी जास्त प्रमाणत वाढ होत रहाते. आपण तूप तयार करताना जर का काही वस्तू त्यात जर का टाकल्या तर ह्रदय साठी उपयुक्त चरबी तयार होते आज आपण याच बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. असे कोणतेपदार्थ आहेत जर का तूप तयार करताना त्याचा उयोग केला पाहिजे.

आरोग्या साठी चांगले फायदे देणारे तूप.

१) हळद :- हळद हे सर्वांच्या स्वयंपाक घरातील महत्वाचे एक घटक आहे. प्रत्येक स्वयंपाक घरातील पदार्था मध्ये त्याचा उपयोग होते. तसेच हळद हि आरोग्यासाठी खुप महत्वाची आहे. बऱ्याच आयुर्वेदिक औषधामध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदी मध्ये अनेक प्रकारचे अँटिओसीडांट गुणधर्म आहे. तसेच नैसर्गिक दृष्ट्या हळद खुप गुणकारी आहे. जर का पण हळद युक्त तूप तयार करू शकतात. एक कप तुपात एक चमच्या हळद आणि थोडी काळी मिरी टाकून काही दिवस हवा बंद बाटलीत बंद करून ठेवा आणि त्याचा वापर करा.

२) तुळस :- तुळस हि नैसर्गिक रित्या आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे. त्याचे सेवन जर का पण केल्यास त्याचे लाभ आपल्याल मिळतात. जर का आपण तूप तयार करताना लोणी उकळताना त्यात काही तुळशीचे पाने टाकल्यास त्याचे गुणधर्म तुपा येतात शिवाय आरोग्यासाठी तयार होणारे तूप सुद्धा तयार होते.

३) लसूण खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच जवळ पस बऱ्याच आजारांवर लसूण खुप गुणकारी आहे. एका भांड्यात लसूण घेऊन त्याच्या पाकळ्या सोलून घ्या तसेच त्या बारीक करा. त्यानतंर तूप घ्या मंद गॅस वर तूप आणि बारीक लसण्याच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या. थोड्यावेळानी गॅस बंद करून भांड्यावर झाकण ठेऊन द्या. थोड्यावेळानी लसूणयुक्त तूप तयार होईल. किंवा लोणी उकळताना सुद्धा तुम्ही त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून तूप तयार करू शकतात.

४) दालचिनी हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. तसेच दालचिनी सौदर्यासाठी सुद्धा खुप महत्वाची आहे. दालचिनीचे तूप आपण दोन प्रकारे तयार करू शकतो. एक लोणी तयार झल्यानंतर त्यात एक ते दोन दालचिनच्या काड्या टाकून मंद गॅस वर ते उकळून घ्यावे आणि नंतर ते गाळून घ्यावे . किंवा तूप एका भाड्या घेऊन त्यात दालचिनी टाकून पाच ते दहा मिनिट ते तूप उकळून घ्यावे नंतर ते गाळून घ्यावे.