भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे
लाईफस्टाईल

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे

भारत हि विविध संस्कृतीची भूमी आहे आणि विविध धर्माचे लोक इथे रहातात. आपल्याकडे मंदिरांचा मोठा वाटा आहे आणि बहुतेकदा भाविक या ठिकाणी प्रार्थना करतात किंवा समाधान मिळवतात. यापैकी बहुतेक मंदिरे अनेक दशकांपूर्वी बांधली गेली आहेत आणि त्यांच्या वास्तुकला आणि पवित्र संस्थांच्या शिल्पे यासाठी जगभरात ओळखल्या जातात. या सर्व मंदिरांमध्ये काही जीर्णोद्धार झाल्याचे दिसून आले आहे आणि भाविकांच्या देणगीच्या मदतीने हे मंदिर ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केले जाते.

भक्तांचा विश्वास देवावर खुप आहे. ज्या काही गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत त्या देवानेच दिल्या आहेत. असे समजून सर्व भक्त मंदिरात काही प्रमाणत जमेल तसेच दन करत असतात. बरेच भक्त हे सोने, चांदी, पैसे, धान्य इत्यादी. स्वरूपात दन करतात. या सर्व गोष्टी त्या त्या मंदीराचे विश्वस्थ त्याची मोजमाप करून ते व्यवस्थित ठेवतात.

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे

साईबाबा, शिर्डी

साईबाबा, शिर्डी
साई बाबा एक संत आणि भारतीय अध्यात्मिक गुरु होते ज्यांचे सर्वत्र आदर आहे. जगभर त्याची उपासना केली जाते आणि आत्म-साक्षात्काराचा उपदेश केला. या ठिकाणी जग भरातून भक्त येतात. खुप मोठया प्रमाणत भक्त त्या ठिकाणी देणगी देत असतात. या देणगी मुळे साई मंदिराची संपत्ती खुप आहे. अंदाजे २०० कोटी पेक्षा जास्त आहे. भक्तांचा विश्वास साई बाब वर खुप आहे.

पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ

Padmanabhaswamy Temple, Kerala
हे भारत आणि जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून जाते. केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये आहे; काही वर्षा पूर्वी एका गुप्त तळघराच्या खोली मधून सुमारे १,००,००० कोटी रुपये सापडले. यात 500 कोटींची महाविष्णूची सोन्याची मूर्ती आणि इतर अनेक खजिना आहेत. अंदाजे या मंदिराकडे १ लाख कोटी संपत्ती आहे.

वैष्णो देवी मंदिर, जम्मू

Vaishno Devi Temple, Jammu

वैष्णो देवी लेणी जम्मूमध्ये आणि 5200 फूट उंचीवर आहे. हे मंदिर वैष्णो देवीला समर्पित आहे ज्यास माता राणी म्हणूनही ओळखले जाते. जवळपास १० दशलक्ष यात्रेकरू हे मंदिर असलेल्या त्रिकुटाच्या पर्वतांना भेट देतात. या मंदिराला अंदाजे वर्षाकाठी 500 कोटींची देणगी येते.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

Siddhivinayak Temple, Mumbai
मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर पण खुप श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात खुप मोठं प्रमाणत देणग्या दिल्या जातात. मुंबईतील हे मंदिर दरवर्षी अंदाजे काही लाखात देणगी येत असते. या मंदिराकडे १२५ कोटींची संपत्ती आहे.

तिरुपती वेंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेशा


हे मंदिर आंध्र प्रदेशात आहे. संपूर्ण भारतातून या मंदिरात भक्त येत असतात. या सर्व भक्त खुप मोठ्या प्रमाणत देणगी देत असतात. या ठकाणी रोज आनंदाचे लाखो रूप देणगी येत असते. तिरुपती वेंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेशातील या मंदिराकडे अंदाजे ५३ हजार कोटी संपत्ती आहे.