या टिप्स उपयोगात आना जेवणाची चव कधीच कमी होणार नाही, kitchen tips
किचन टिप्स

या टिप्स उपयोगात आना जेवणाची चव कधीच कमी होणार नाही.

स्वयंपाक करण्यासाठी बऱ्याच लोकांच्या अंगावर काटा येतो. काही जण तर स्वयंपाक करणे म्हणजे सर्वात अवघड गोष्ट आहे. कारण असे कि जर का एकादी भाजी करतात जर का चुकून मीठ जास्त पडले कि तिखट जास्त झाले तर काय करायचे. चपाती करताना किंवा भात शिजवताना जर का चुकून करपले तर काय सारख्या अनेक गोष्टी असतात, ज्यामुळे लोकांना स्वयंपाक करायला आवडत नाही किंवा त्यांच्या मनात भीती असते.

जे लोक सुरुवातीला स्वयंपाक करायला सुरुवात करतात अशा लोकांसाठी काही तज्ञ लोकांनी छोट्या छोट्या टिप्स तयार करून ठेवल्या आहेत. जर का आपण त्याचा वापर केल्यास आपल्या येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी दूर होतील तसेच मानतील जी काही भीती आहे ती सुद्धा दूर होईल. स्वयंपाक करणे हि एक कला आहे. आणि कला आत्मसाद करण्यसाठी त्या कलेचे काही टिप्स आपल्याला माहिती असणे गरजेचे असते.

आज आपण अशाच एकही किचन टिप्स जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या स्वयंपाक करताना कोणतीच अडचण येणार नाही. तसेच जर का कोणती अडचण आलीच तर ती अशी दुरुस्त करायची याबद्दल सुद्धा थोडक्यात जाऊन घेणार आहोत. किचन टिप्स मुळे तुमच्यात एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण होईल.

स्वयंपाक घरातील टिप्स

  • गाईचे दूध नासल्यावर त्यातील पाण्याने कणिक भिजवा किंवा पराठे बनवा ते खूप छान लागतात आणि मऊ बनतात.
  • भाजी बनवताना त्या पिठात थोडे तांदुळाचे पीठ घातल्यामुळे भाजी खूप कुरकुरीत बनतात.
  • उरलेला ब्रेड असेल तर ते मिक्सरवर फिरवून त्याचा चुरा बनवून फ्रिज मध्ये हवा बंद डब्यात ठेवा आणि आणि त्याचा उपयोग कबाब आणि कटलेट बनवताना करा ते तुटणार नाहीत .
  • गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूट भर थोडे मीठ टीका चव चांगली बनेल.
  • दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या बारीक चिरा आणि थोड्या तेलात ते लाल होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर पाणी काढून टाकलेले दही घ्या त्यात थोडे तिखट. मीठ, कोथींबीर बारीक चरलेली, आणि चिली फ्लेक्स यांचे मिश्रण तयार करा. मस्त पैकी तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डिप तयार आहे.
  • जिकंत भेंडीची भाजी करताना जास्त चिकट पणा येत असेल तर. भेंडीची भाजी करताना त्यात थोडे लिबू पिळा यामुळे चिकट पणा कमी होईल. तसेच दुसरी पद्धत अशी कि ज्या वेळी भेंडीची भाजी करताना त्यात बेसन पीठ टाकल्यास, चिकट पण कमी होईल तसेच भाजी कुरकुमीत होईल.
  • काही वेळेस ग्रेव्ही तयार करताना त्यात तेल जास्त पडते किंबहुन जास्त होते. ते काढण्यासाठी ती ग्रेव्ही थोडावेळ फ्रिज मध्ये किंवा फ्रिजर मध्ये तेव्हा काही वेळा नंतर ग्रेव्हीवर आलेले तेल काढून टाका. आणि पुन्हा ती ग्रेव्ही गरम करून घ्या.