रोज एक वाटी दही खाल्यामुळे होतात हे फायदे
आरोग्य

रोज एक वाटी दही खाल्यामुळे होतात हे फायदे …

मित्रांनो दही हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते .दह्यामध्ये प्रोटीन ,लॅकटोज ,आयरन,फॉस्फरस अश्या प्रकारचे पोषण तत्व असतात. त्याचप्रमाणे कॅल्शियम ,विट्यामिन बी ६ आणि बी १२ हि सुद्धा पोषणतत्व असतात.दह्यामध्ये खूप महत्वाचे गुण असतात .तसेच दही हे आरोग्यदायी सुद्धा असते.दही हे आपले शरीर सुंदर बनवण्याचं काम करते.

रोज एक वाटी दही खाल्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. दही खाल्यामुळे शरीरातील कॅलरीज ह्या बर्न होतात.दह्यामध्ये प्रोटीनची मात्र हि जास्त असते. दही खाल्यामुळे भूक देखील कमी होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दह्याचे सेवन हे रोज केले पाहिजे.

आपण रोज दह्याचे सेवन केले तर आपली पचनक्रिया सुधारते. ज्यांना अपचनाचा त्रास असेल त्यांनी दही हे आवश्यक खायला पाहिजे. दह्यामध्ये फायबरची मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे पचनाच्या सगळ्या समसेसाठी दही हे एक रामबाण उपाय आहे. तसेच उन्हाळा असल्यामुळे दही हे आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे आपली इम्युनिटी शक्ती वाढवण्याचं काम दही करत असते.दही हे व्हाईट ब्लड सेल्स वाढवण्याचं काम करते.

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. त्याचप्रमाणे दह्यात विट्यामिन बी १२ आणि कॅल्शियम चे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीर आणि हाडे हि मजबूत होतात. शरीरात जर सूज आणि दर्द कमी करण्याचे काम दही करते. दही हे रोज खाल्याने भरपूर फायदे होतात.दही खाल्यावर होणारे फायदे आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात.

१)पचनशक्ती वाढवते:-

दही हे रोज एक वाटी जरी खाल्ले पाहिजे. त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात उन्हाचा त्रास हा आपल्याला होत नाही. तसेच शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.

२)सौंदर्यात भर पडते:-

दह्याचं फेस पॅक बनून किंवा दही हे शरीराला लावून अंघोळ केल्यास शरीर हे सुंदर दिसायला लागते. तसेच शरीरावरचे टॅनिंग हे निघून जाण्यास मदत होते.तसेच दह्यात मध मिक्स करून लावल्यास त्वचा उजळते.

३)चांगली झोप येते:-

जर कोणाला झोप न येण्याचा त्रास असेल त्यांनी दही हे आवश्य खावे यामुळे त्यांना चांगली झोप येण्यास मदत होते.त्यामुळे रोज एक वाटी तरी दही खायला पाहिजे.

४)वजन कमी होते:-

दही रोज खाल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी रोज एक वाटी दही खाल्यास फॅट बर्न होण्यास मदत होते.