या वर्षातील सर्वात पवित्र महिना सध्या सुरू आहे. या महिनात बरेच लोक आपल्या परीने देवांची उपासना करतात. या महिन्यात बऱ्याच महिलाना वर्षभरात जर का उपवास ठेवता येत नसेल तर अशा वेळी बरेच जण या महिन्यात उपास करतात. बऱ्याच महिला श्रावण महिन्यात सोमवारी उपास करतात त्याच सोबत गुरुवार , शुक्रवार आणि शनिवार सुद्धा करतात. असे मान्यता येते कि या महिन्यात केलेली उपासना ही सर्व श्रेष्ठ असते.
श्रावण महिना हा भगवान महादेवाला समरप्रीत आहे. या महिन्यात महादेवाची उपासना केल्याने आपल्या जीवनातील कष्ट दूर होऊन आनंदाचे दिवस येतात. यामुळे सर्व भक्त हे भगवान महादेवाची उपासना करतात. जर का सौभाग्यवती स्त्रियांनी श्रावण महिन्यात भगवान महादेवाची उपासना करताना जर का त्याच सोबत अजून पाच हि कामे केल्यास घरात आनंदाचे आणि सकारात्मक वारे येत जातात.
श्रावण महिन्यात फक्त महादेवाची पूजा नकरता माता पार्वतीची आणि देवी दुर्गेची पूजा अवश्य करावी. असे मान्यता येते कि या महिन्यात केलेली धर्मिक कार्य आणि उपासना केल्यास आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात शिवाय सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. ज्या काही नकारात्कमता आपल्या जीवनात आलेल्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते.
अंखड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी हे पाच कामे करावीत. यामुळे घरात सुख समृद्धी येतेच शिवाय घर शांत आणि आनंदी रहाते. जाणून घेऊ अशी कोणती पाच कामे आहात जी अवश्य करायला हवीत. श्रावण या पवित्र महिन्यात गणपतीची उपासना करावी म्हणजे काय तर या महिन्यात मंगळवारी आणि बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करावे. यामुळे घरातील दरिद्रता कमी होण्यास मदत होते.
दुसरे काम तुम्हला मगाशी सांगितल्या प्रमाणे भगवान महादेवाची पूजा करताना माता पर्वती आणि देवी दुर्गेची सुद्धा पूजा करा. पिवळ्या रंगाचे सिंदूर हे त्यांच्या प्रतिमाला लावून आपल्या सुद्धा कपाळ किंवा भांगेत लावावे. यामुळे घरातील वादविवाद कमी होऊन वैवाहिक जीवन चांगले होते. तिसरे काम रोज सकाळी लवकर उठून आपल्या घरातील देव पूजा हि सूर्यदोय होण्याआधी पूर्ण करण्याचे पर्यंत करा यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत होते. त्याच सोबत आत्मविश्वास सुद्धा वाढण्यास मदत होते.
चौथे काम म्हणजे माता पार्वतीला सौभाग्याचे अलंकार अर्पण करा त्याच सोबत. आपल्या पेक्षा जेष्ठ सौभाग्यवती महिलेला असाच एक सौभाग्या अलंकार देऊ करा. हे करताना दिवस महत्वाचा असतो. ज्या दिवशी प्रदोष आहे. त्या दिवशी हे कार्य करा, यामुळे नक्कीच भाग्य बदलण्यास मदत होईल. पाचवा आणि शेवटचे कार्य सुख आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणजे हिरवा रंग यामुळेच याच महिन्यात हिव्या रंगाच्या बांगड्या नक्की घालाव्यात. हि पाच कामे नक्की तुम्ही या श्रावण महिन्यात करावी.
टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.