नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो प्रेत्येकाच्या घरात मसाल्यात वापरला जाणारा पदार्थ म्हणजे विलायची आणि ह्या विलायचीच्या सुंगधामुळे आपण अगदी डोळे झाकूनसुद्धा आपण तिला ओळखू शकतो. चहा बावनवण्यापासून ते अगदी रेसिपीसमध्ये ह्या विलायचीचा वापर हा हमखास होतोच. पण तुम्हाला माहिती आहे कि एक प्राचीन औषधी म्हणून आपण वापरत आलेलो आहोत. अगदी मोठ्या मोठ्या रोगांचा उपचारामध्ये हि विलायची वारपली जाते.
मित्रांनो सकाळी उठल्यानंतर अगदी काही न खाता पिता आपण जर ह्या २ विलायची चघळून चघळून जर खाल्या तर आपले पाच रोगांपासून संरक्षण होते. हे आजार जर तुम्हाला झालेले असतील तर हे आजार सुद्धा अगदी मुळासकट बरे होतात. चला जाणून घेउयात कि हे पाच आजार कोणते आहेत. अपचन, आजकाल लोक फास्ट फूड, तळलेले पदार्थ लोकांना खूप आवडतात मग असे तळलेले पदार्थ खाल्ल्याने आपली पचनसंस्था कमकुवत बनते. अगदी तुम्ही काही खाल्ले तरी पचत नाही आणि ह्यालाच आपण अपचन(indigestion)म्हणतो.
जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर बारीक इलायची जर चावून चावून जर खाल्या तर मित्रांनो आपला अपचनाचा त्रास दूर होतो. आपली पचनसंस्था मजबूत बनते, आपण जे काही खाऊ ते पचू लागते. दुसर म्हणजे तोंडाची दुर्गंधी, बऱ्याच लोकांना हा त्रास असतो कि तोंडाची दुर्गंधी येते, तर ह्यावर देखील हा उपाय म्हणजे सकाळी उठून दोन विलायची चावून चावून खाणे अत्यंत उपयोगी आहे. आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर होते.
स्मरण शक्ती चांगली करते हि विलायची, ज्या लोकांना अभ्यास असतो, बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, विशेषकरून विदयार्थी लोक किंवा ज्यांना बौद्धिक काम जास्त असते अश्या सर्वानी जर हा उपाय केला तर आपली स्मरण शक्ती चांगली वाढते. ह्यामुळे आपल्याला बराच फरक दिसून येईल फक्त तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हि विलायची चावून चावून खायची आहे.
चौथा नंबर ला आहे ते म्हणजे डोकेदुखी, बऱ्याच लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो. कोणतेही कारण नसताना बऱ्याच लोकांचे डोके दुखते. आणि मग त्यासाठी ते वेगवेगळ्या गोळ्या घेतात. औषधे घेतात, हे सर्व करण्याऐवजी आजचा फक्त हा एक उपाय नक्की करा. फक्त २ विलायची चावून चावून खा व नंतर एक ग्लास पाणी प्या असे जर तुम्ही सलग १ ते २ महिने करत राहिला तर तुमचा हा त्रास कायमचा दूर होईल. आणि मित्रांनो पाचवा व अत्यंत महत्वाचा उपयोग तो म्हणजे त्वचा विकार.
बऱ्याच जणांना तरुण वयात पिंपल्स म्हणजेच मुरूम येतात गजकर्णाचा त्रास असतो. खरूज, खाज असे त्वचेचे विकार ज्यांना आहेत त्यांनी तर हमखास सकाळी पाणी पिल्यानंतर हा प्रयोग करा. पिंपल्स अगदी मुळापासून निघून जातात, त्वचा सतेच बनते, गजकर्णाचा त्रास निघून जातो. खाज, खरूज हे देखील निघून जातात ह्याचे कारण आहे कि विलायची आहे ती आपले रक्त शुद्धीकरण करते. तर मित्रांनो अश्या प्रकारे हे पाच आजार आहेत ते दूर करण्यासाठी आपण विलायची चा सांगितल्याप्रमाणे वापर अवश्य करा आपल्या सर्व समस्या दूर होतील.