येत्या काही दिवसात आपल्या सर्वांचे लाडके श्री गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. प्रत्येक घरात त्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली असेल. लहानापासून ते मोठ्या पर्यंत प्रत्येक जण आनंदाने आपापल्या परीने तयारी करत असतो. दहा दिवस चालणाऱ्या या आनंदाच्या उत्सहात प्रत्येक घरात काही तरी नवीन करण्याचे पर्यंत चालू असतात. गणरायाचे स्वागतामध्ये कोणतीही कमतरता रहाणार नाही याची काळजी प्रत्येक जण नक्की घेत जातो.
श्री गणपती बाप्पाला घरी आणताना काही नियमनाचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच त्यांची स्थापना, पूजा करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. श्री गणेशाची मूर्ती कशी असावी, कोणत्या दिशेला श्रींची स्थापना करावी, तसेच घरी गणपतीची मूर्ती आणल्यावर प्रथम काय करावे या सर्व प्रश्नची उत्तरी आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
श्री गणपती बाप्पाला घरी आणताना
ज्या वेळी आपण श्री गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना काही वस्तू नक्की सोबत घेऊ जावे. जसेकी तामण, गुलाल, जानवे,पांढरे किंवा लाल रंगाचे वस्त्र, घनटी या वस्तू जरूर घेऊन जावे. तसेच आपल्या डोक्यावर टोपो किंवा रुपमल नक्की ठेवावे. जर तुमच्या कडे वेळ असेल तर जाताना ज्या ठिकाणी श्रींची स्थापना करायची आहे त्या ठिकणची (आसन ) पूर्ण तयारी करून जावे. यामुळे घरी आपल्यावर कोणत्याही प्रकारची धावपल होणार नाही.
श्री गणपतीची मूर्ती हि सुंदर असणे गरजेचे आहे. तसेच त्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा डाग लागणार नाही याची काळजी नक्की घ्यावी. तसेच मूर्ती घरी घेऊन येताना त्या ठिकाणी गुलाल, अक्षदा वाहून जानवे घालावे आणि त्या मूर्ती वरती जे काही वस्त्र आणले आहे ते झाकून घ्यावे. कारण जर का श्रींची मूर्ती सुंदर आणि आकर्षक असेल तर इतरांची नजर पडू शकते. त्यामुळे श्रींची मूर्ती झाकून आणतात.
श्री गणेशाची मूर्ती कशी असावी
श्री गणेशाची मूर्ती हि सुंदर आणि आकर्षक असावी. तसेच ती छोटी असली तरी चालेले. शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केलेली मूर्ती आले तर चांगले. तसेच मूर्तीचा कलर उडालेला, तुटलेली किंवा भांगलेली नसावी. कारण भांगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. शक्यतो उभी असलेली मूर्ती अन्य टाळावे. तसेच घरात गणपतीची मूर्ती हि डाव्या सोंडेची आणावी. उजव्या सोंडेची मूर्ती हि शक्यतो मंदिरात असते किंवा बसवली जाते.
श्री गणेशाची स्थापना हि शक्यतो ईशान्य दिशेला करावी आणि श्रींचे मुख हे पश्मिकडे राहील याची काळजी घ्यावी. जोपर्यंत मूर्तीची प्राणपतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्ती मध्ये देवरूप येत नाही. त्यामुळे त्याची प्राणपतिष्ठा करावी. पूजा करावी. काही वेळेस असे होत कि प्राणप्रतिष्ठा होण्याआधी मूर्ती भंगपवते अशा वेळी घाबरू न जात त्या त्यामूर्तीला गोड नैवेद्य दाखवून दुसरी नवीन मूर्ती आणावी आणि प्राणप्रतिष्ठा करावी.
रोज नैवेद्य म्हणून तुम्हला विविध गोड पदार्थ करावा असे काही नाही रोज शिरा, साखर नारळाचा खिस, किंवा दही भात सुद्धा दखवला तरी चालतो. घरात श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर वादविवाद करुनये किंवा होणार नाही याची काळजी घ्यावी.
बऱ्याच ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दिवस असे आगमन असते. पहिल्यदवशी सकाळी पूजा झाल्यावर रात्री आरती करुनये. दसऱ्या दिवशी सकाळी आणि रात्री श्रींची आरती करवावी.
टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.