मधुमेह (Prediabetes) होण्यापूर्वीच दिसु लागतात हि लक्षणे
आरोग्य

मधुमेह (Prediabetes) होण्यापूर्वीच दिसु लागतात हि लक्षणे…

मित्रांनो मधुमेह हा आजकाल कॉमन झाला आहे.मधुमेह हा वृद्धांनाच नाही तर लहान मुलांपण हा गंभीर मधुमेह होत आहे.मधुमेह होण्यापूर्वीच्या परिस्थितीला प्रिडाईबीटीस असे म्हणले जाते.अश्या परिस्थितीमध्ये शरीरातील साखर हि थोडी वाढलेली असते,परंतु खूप म्हणजेच मधुमेह रुग्णांसारखी पण वाढलेली नसते.

प्रिडाईबीटीस हि परिस्थिती खूप धोकादायक असते.जेव्हा तुम्हाला प्रिडाईबीटीस असतो तेव्हा तुम्हाला काळजी घेणे खूप गरजेचे असते नाहीतर तुम्हाला मधुमेह होऊ शकतो.त्यामुळे प्रिडाईबीटीस असतो तेव्हा वेळीच काळजी घेतल्यास तुम्ही डायबिटीसपासून वाचू शकता.मधुमेह होण्यापूर्वी तुम्हाला कोणती लक्षणे दिसू लागतात ते आपण खालीलप्रमाणे पाहुयात .

१)त्वचेचा रंग काळा पडणे :-

आपल्या शरीरातील साखरेची पातळी जेव्हा वाढते तेव्हा त्वचेचा रंग हा काळा दिसायला लागतो.तसेच मानेचा आणि हाताच्या कोपऱ्याचा रंग हा अधिक गडद कला दिसू लागतो.हे प्रिडाईबीटीसमध्ये लक्षण दिसून येतात.

२)थकवा जाणवतो:-

रोजचा आहार व्यवस्तीत घेऊन आणि पुरेशी विश्रांती घेऊनसुद्धा जर थकवा जाणवत असेल तर तुम्हला प्रिडाईबीटीस असू शकतो. तरी थकवा यायचं नेमकं कारण काय आहे ते डॉक्टरणाच्या सल्ला आणि तपासणी केल्यावर कळेल.

३)सतत लघवीला जावे लागणे:-

मित्रानो तुम्हाला जर सतत लघवीला जावे लागत असेल तर तुम्हाला प्रिडाईबीटीस असू शकतो. जेव्हा तुमच्या शरीरातील साखर वाढते तेव्हा मूत्रपिडाला जास्तीची साखर बाहेर काढण्यास जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे सतत लघवीला जावे लागते.

४)सतत तहान लागणे:-

प्रिडाईबीटीस असल्यामुळे सतत लघवीला जावे लागत असल्यामुळे सतत तहान लागते आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे सतत पाणी पिण्याची गरज भासते.

५)पोटाची चरबी वाढल्यासारखी दिसते :-

जेव्हा प्रिडाईबीटीस होतो तेव्हा पोटाची चरबी हि वाढल्यासारखी दिसू लागते. तसेच पुरुषांच्या कमरेचा आकार हा ४० च्या वर गेला तर आणि स्त्रियांचा पोटाचा घेर ३५ च्या वर गेला तर समजायचं कि तुम्हाला प्रिडीबीटीस असू शकतो.