राशिभविष्य

ह्या तीन राशी गर्दीत दिसतात उठून.

माणसाच्या आयुष्यातील परस्थिती अगदी दररोज सारखीच असते असे नाही ती दररोज बदलत असते. ग्रहांचे होणारे रशिपरिवर्तन हे सतत माणसाच्या आयुष्यात कोणते ना कोणते बदल घडवून अनत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती हि सतत बदलते. आणि त्यानुसार माणसाच्या आयुष्यात सुखाचे व दुःखाचे क्षण हे येत असतातच. असे होते कधी कधी खूप काम करूनही यश मिळत नाही तर कधी कधी काही काम न करता देखील यश मिळते. हा सगळेच ग्रहांच्या राशी परिवर्तनाने घडून येत असते.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या सतत होणाऱ्या बदलामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख व दुःखाचा सामना करावा लागतो, ह्या जगात प्रेत्येकाची रास हि वेगळी असते ग्रहनक्षत्र व त्यांची बदलती हालचाल सुद्धा लोकांवर त्यांच्या राशीनुसार कुंडलीतील ग्रहांप्रमाणे प्रभाव पाडत असतात. ग्रहांच्या शुभ स्थानानुसार त्यांना शुभ फळे मिळतात. एकूण १२ राशी आहेत आणि त्यांपैकी ३ राशी अश्या आहेत ज्या गर्दीमध्येदेखील उठून दिसतात, आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात. कोणत्या आहेत त्या राशी हे आपण जाणून घेऊयात.

ज्या राशींबद्दल आपण पाहणार आहे त्या राशीचे लोक हे जिद्दी व मेहनती असतात, हेच त्यांना प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाते. बाकीपैकी कोणीदेखल ह्या राशीच्या लोकांचे अनुकरून करू शकत नाही. ह्या राशीचे लोक नेता व लिडर बनु शकतात, वेळोवेळी त्यांच्या बोलण्यातून जाणवते कि ह्या राशी परिपूर्ण आहेत. बहुतेक सर्वच ठिकाणी ह्या राशी दिसून येतात. त्यातील पहिली राशी आहे ती म्हणजे.

मेष रास: ह्या राशीचा स्वामी हा मंगळ आहे, मंगळाची पूर्ण कृपादृष्टी ह्या राशींच्या लोकांवर असते. ज्यामुळे ह्या राशीचे लोक उत्साही व निर्भिड असतात. ह्या राशीचे लोक जोखीम घेण्यास घाबरत नाही, कोणतेही काम असूद्यात हे लोक तयार असतात. ह्या गुणामुळे ते एक चांगले नेतृत्व करू शकतात. ह्या लोकांमध्ये ऊर्जा असते हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याची धडपड असते. ह्याच जिद्दी स्वभावामुळे हे लोक करोडपती होतात.

सिंह रास: ह्या राशीचा स्वामी हा सूर्यदेव आहे. सूर्यदेवांची कृपा असल्याने हि बलवान आहे, नावाप्रमाणे हे लोक राजासारखे जीवन जगतात. सूर्यदेवांची कृपा असल्याने ह्या राशीच्या लोकांना समाजात आदर, सम्माम सर्वच मिळते. हे लोक आपल्या जीवनात यशस्वी होतात व ते करोडपती देखील बनतात.

वृश्चिक रास: ह्या राशीवर मंगळाचा प्रभाव आहे, ह्या राशीच्या लोकांना त्यांच्या कामामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आवडत नाही. कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्याचा ह्यांचा प्रयत्न असतो. ह्या राशीचे लोक खूप धैर्यवान असतात खूप उत्साही असतात. बहुतेक उच्चपदस्वी असतात, ह्या राशीच्या लोकांमध्ये एवढे सामर्थ्य असते कि ते कोणतेहि काम अगदी सहज करू शकतात. ह्या राशीचे लोक हे करोडपती बनतात. ह्या राशीच्या लोकांना फक्त एक काळजी घ्याची आहे कि यशाच्या मार्गावर चालताना इतरांच्या भावनांचा देखील आदर करावा.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.