या गोष्टी चुकून सुद्धा करू ना शिवलिंगाचे दर्शन घेताना.
धार्मिक

या गोष्टी चुकून सुद्धा करू ना शिवलिंगाचे दर्शन घेताना.

भगवान महादेवाचा आवडता महिना श्रावण महिना सध्या सुरु आहे. या महिन्यात सर्वत्र धार्मिक गोष्टी जास्त प्रमाणत केल्या जातात. या श्रावण महिन्यात सर्व भक्त महादेवाचे दिर्शन घेण्यासाठी विविध धार्मिक स्थळी जातात. संपूर्ण भारतात बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी पाच ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहेत. या पाचही ठिकाणी श्रावण महिण्यात राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून भक्त या ठिकाणी येत असतात.

अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात जर आपण भगवान महादेवाची पूजा आणि उपासना मापासून केल्यास त्याचे लाभ आपल्या अनेक वर्ष भेटत राहतात. भगवान महादेवाचे पूजा करताना काही नियमाचे पालन आपल्याला करायचे आहे. काही वेळेस आपण उपासना करतो पूजा करतो पण काही चुका आपल्या हातातून नकळत होतात त्यामुळे त्याचे लाभ आपल्याला मिळत नाही.

ज्या वेळेस आपण मनापसून उपासना केल्यावर लगेच भगवान महादेव आपल्या प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. त्याच प्रमाणे आपण उपासना करताना किंवा पूजा करताना काही चुका केल्यास त्याचे वाईट प्रणाम सुद्धा आपल्यावर लगेच होतात. असे म्हंटले जाते कि भगवान महादेव जितके भोळे आहेत ततकेच लवकर क्रोधीत होतात. त्यामुळेच शिवलिंगाचे दर्शन घेताना काही चुका करू नका. नाहीत त्याचे वाईट परिमाण आपल्या भोगावे लागतात.

धर्मशास्त्रात काही अशा गोष्टी संगितला आहेत त्याचे पालन आपल्या हातून होयला हवे पण चुकून अशा काही गोष्टी आपल्या हातून होतात त्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. आपण सर्व जण महादेवाच्या प्रतिमेची पूजा करतो, फोटोची पूजा करतो, शिवलिंगाची पूजा करतो, पण त्यात काही नियम संगितले गेले आहेत.

शिवलिंगा मध्ये दिव्य प्रकारची एक ऊर्जा असते, तेजस्वी पणा असतो. त्यामुळे जे लोक शिवलिंगाची पूजा करता दर्शन घेतात त्यांच्या जीवनात सुख सम्रुद्धी येते. नियम काय आहे. जे पुरुष वैवाहिक असू किंवा नसू त्यांनी शिवलिंगाचे स्पर्श करून दर्शन घेणे योग्य आणले आहे. तसेच ज्या मुलींचे लग्न झाले आहे अशा नि सुद्धा स्पर्श करून दर्शन घेणे सुद्धा चालते. पण जय मुलींचे लग्न झाले नाही अशा मुलींनी शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेणे चुकीचे मानले गेले आहे.

धर्मशास्त्र असे मानतो. ज्या वेळी आपण शिवलिंगाला स्पर्श करून आपल्या जीवनातील कष्ट दूर झाले पाहिजे तसेच, आपल्या इच्छा पूर्ण झल्या पाहिजे अशी मागणी करतोच . त्याच बरोबर आपल्या घरात संतती उत्तम प्रकारी व्हवी अशी भावना शिवलिंगास स्पर्श करण्यामागे असते. अशी मागणी अविवाहित मुलींनी मागणी करणे चुकीचे आहे. त्यामुळे अविवाहित मुलींनी शिवलिंगाला स्पर्श करणे चुकीचे मानले गेले आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.